Skip to main content

वेड्या मना...

 

A click by Varun Bhagwat

मन गांजलेलं असतं.

मन थकलं- भागलेलं असतं.

मन कंटाळलेलं असतं.

मन रुसलेलं असतं.

मन चिडलेलं असतं.

मन त्रासलेलं असतं.


हे मन असतं.

आज असं तर उद्या तसं असतं.

किती समजावलं तरी त्याला हव्या त्याच गाडीने ते प्रवास करत असतं.

पूर्वसूचना देऊनही त्याला हव्या त्याच वेगाने ते धावत असतं.


मन अवखळ असतं.

मन चपळ असतं.

मन खोलात जाऊन विचार करत असतं.

मन खलबतं मांडत राहत असतं.

मन स्वतःलाच छळत राहत असतं.

मन विचार करत असतं पण अतीशय अविचाराने वागत असतं.


मन कधी पाठिंबा देत असतं तर कधी विरोध करत असतं.

मन स्वतःच स्वतःशी विरोधाभासी वागत असतं.


मन वेडं असतं.

मन शहाणं असतं.

मन करत असतं.

शरीर भरत असतं.

कधी शरीर काही करून बसत असतं.

मग मन ते भरत बसत असतं.



मनाला विचारावं तर ते मनासारखं वागणार असं म्हणत असतं.



मन सतावत असतं.

मन मनवत असतं.

मन गच्च असतं.

मन मोकळं असतं.



मन मनात अराजक माजवत असतं.

मनच मनाची समजूत घालत असतं.

मन हरत असतं.

मन जिंकत असतं.

मन झुरत असतं.

मन प्रेमात पडत असतं.


मन खात असतं.

मन कुठेही, कधीही जात असतं.

मन मानेल ते सांगत असतं.

मन मानेल तसं करायला लावत असतं.


मन रुसत असतं.

मन फसत असतं.

मन थकत असतं.

मन लपत असतं.

मन शोधत असतं.

मन मिळवत असतं.

मन गमवत असतं.

मन शमवत असतं.

मन सगळं मनाचं करत असतं.


मनाला भान नसतं.

मनाला काम नसतं.

मनाला आवरणं माहीत नसतं.

मनाला सावरणं जमत नसतं.

मनाला सगळं येत असून काही येत नसतं.


मनाच्या विस्ताराला सीमेचं बंधन नसतं.

हवं तिथे भटकून यायला मन घाबरत नसतं.

मन कोणालाच भीत नसतं.

तरीही मनात भीतीचं जाळं पसरलेलं असतं.


मनाच्या या अवस्थांना वेळेचं भान नसतं.

मनाच्या या वागण्याला स्थळाचं बंधन नसतं.

मनाच्या या कारभाराला गणित नसतं.

मनाच्या घटनांना क्रम असेलच असं नसतं.


पण,

मन मनालाच तर समजून घेत असतं.

मन मनालाच आपलं मानत असतं.

जीवनात सगळं मनाचं असतं.

मनाच्या बळावर अनेक गोष्टींचं साध्य अवलंबून असतं.



मनाच्या जखमा घालवायला मानसिक बळच कामी येत असतं.

मनच मनावर फुंकर घालायचं काम करत असतं.

मन मनाला मुक्त करत असतं.

मनाचा गुंता मनच सोडवत असतं.



मनाचं दडपण मनच घालवत असतं.

मनाचं वेडेपण मनालाच शहाणं करत असतं.



मनापासून केलेलं मनाला बरोबर समजत असतं.

एका मनाच्या कप्प्यातलं दुसऱ्या समजून घेणाऱ्या मनाला ठाव असतं.

एक मनाचं गाणं दुसरं मन जाणत असतं.

एका मनाचं मनमोकळेपण दुसऱ्या मनाला आवडत असतं.



मनातलं बोलणं खरंच किती गरजेचं असतं.

मनाला वेळीच थांबवणंही महत्त्वाचं असतं.



मन तुझं, मन माझं, मन आपलं, मन सगळ्यांचं असतं.

मनाने मनाशी बोलत राहणं जिवंतपणाचं लक्षण असतं.


- वरुण भागवत


Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...