Skip to main content

या जगात चांगली माणसं आहेत का?

A click by: Sushil Ladkat


२ मित्र- गोविंद आणि रमाकांत घराबाहेरच्या रस्त्यावर चालत गप्पा मारत होते.

“गोविंद, माझ्या मते या जगात चांगली माणसं वगैरे काही उरली नाहीयेत.”

“मला वाटतं की आपण चांगलं काम केलं तर आपल्या बाबतीत चांगलंच घडतं.”

“असं काही नाही.”

“अरेच्च्या... अरे रमाकांत, आपण एखाद्याच्या बाबतीत चांगले वागलो तर कधी ना कधी त्याची परतफेड चांगल्या मार्गानेच होते.”

“माझा ना या तत्वज्ञानावर विश्वासच नाही.”

“पण तुला असं अचानक काय झालं?”

“अचानक वगैरे नाही. परवाचा incident आठवला. दारावर आलेल्या त्या फुगेवाल्याला कशाला मदत केली? उगीच दया येत असते तुला...”

“हे बघ त्याचा मुलगा पण छोट्या मोठ्या गोष्टी विकत होता- तो गोड खाऊ खाण्याच्या वयात त्याला तो विकावा लागत होता. ते मला पाहवलं नाही. मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे दिलेत.”

“त्याने त्याच रात्री त्या पैशाची दारू प्यायली असेल.”

“तुला काय माहित रे?”

“तुला तरी काय माहित की त्याने त्या पैशाचा वापर मुलाच्या शिक्षणासाठी केला असेल?”

“तो म्हटला होता की मी माझ्या मुलाला uniform घेतला की दाखवायला पहिला तुमच्याकडे घेऊन येईन.”

“थापा...”

“बरं...”

 

तेवढ्यात जवळच्या झाडावर बसलेलं एक कबुतर त्यांना दिसलं.

गोविंद म्हणाला, “लहानपणी ऐकलेली मुंगी आणि कबुतराची गोष्ट अशी छोटी मदत करायला भाग पाडते.”

“म्हणजे?”

गोविंद सांगू लागला, “एक मुंगी नदीत वाहून चाललेली कबुतराला दिसली. खरंतर तो दुर्लक्ष करू शकत होता पण त्याने पटकन एक काठी नदीत टाकली. त्या काठीच्या आधाराने मुंगी किनाऱ्याला लागली आणि तिचा जीव वाचला. काही दिवसांनी एक माणूस त्या कबुतराला पकडण्यासाठी त्याचं जाळं पसरवत होता. कबुतर बेसावध होतं. मात्र या मुंगीचं लक्ष होतं. आधी तिला सुचेना की काय करावं. पण तिने परिस्थितीचं भान राखलं. ती शिकारीसाठी आलेल्या त्या माणसाच्या पायाला कडकडून चावली. तो ओरडला. कबुतर सावध झालं आणि पटकन झाडावरून उडून गेलं.”

“असं फक्त गोष्टीत होतं” असं म्हणत रमाकांत पुढे जाऊ लागला. त्याच्या लक्षातच आलं नाही की आपला मित्र गोविंद मागे पडलाय. मागे क्षणार्धात भलतंच घडत होतं. गोविंद गोष्ट सांगून झाल्यावर चालता चालता एका दगडाला अडखळून पडला होता. मागून एक भरधाव दुचाकी येत होती. तिच्या horn च्या आवाजाने रमाकांत ने मागे पाहिलं. मागे गोविंद पडला होता. गाडी येत होती. रमाकांत धावत गोविंद ला वाचवायला जाऊ लागला. पण गाडी जवळ येत होती. तेवढ्यात हे पाहणारा एक माणूस प्रसंगावधान राखत गाडीकडे इशारा करत “थांबा” म्हणून ओरडला. तोपर्यंत रमाकांत पोचला आणि दोघांनी पटकन गोविंद ला रस्त्यातून बाजूला घेतलं. गाडी नुघून गेली. अपघात टळला.

 

“अरे तू इथे?” गोविंद आश्चर्याने म्हणाला.

“हो साहेब, तुम्हाला म्हणालो होतो ना पोराला uniform घेतला की दाखवायला येईन. तुमच्या घरीच येत होतो आणि तुम्ही हिकडं चालताना दिसला. इचार केला गाठावं इकडच. तेवढ्यात तुम्ही पडले आणि... ते बघा तिकडं थांबलंय पोरगं. तुम्हाला लागलं नाही ना साहेब?”

गोविंद हसत म्हणाला, “नाही. Thank you.”

रमाकांत आ वासून पाहत राहिला.

 

-वरुण भागवत        


Comments

  1. हे सगळं खरं आहे पण या कलियुगात कोणावर विश्वास ठेवावा हे मात्र कळतं नाही हेही खरे, पण आपण चांगल्या मनाने नक्कीच मदत करत राहावी हेही नक्की 👍👍👍

    ReplyDelete
  2. खूप छान वरुण, कार्य करत रहावे, विश्वास किंवा अविश्वास नंतर परतफेड होत असते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...