Photography- Varun Bhagwat भलाथोरला हत्ती पाहिला. एक नाही. अनेक होते. आपापल्या विश्वात रमले होते. निवांतपणे डुलत- डुलत फिरत होते. का नाही फिरणार... ही तर त्यांची जागा.. हे तर अभयारण्य. इथे आपण माणसं बंदी आणि ते मोकळे! बंद राहण्यावरून एक गोष्ट आठवली. एक माणूस रस्त्यावरून जात होता. रस्ता कच्चा, विशेष वर्दळ नव्हती. त्या रस्त्याच्या कडेला बांधलेला हत्ती त्याला दिसला. आता हत्तीसारखा प्राणी म्हणजे किती अवाढव्य असतो याची आपल्याला कल्पना आहेच. पण इतक्या अवाढव्य प्राण्याला बांधून ठेवणं ही कल्पना आधी त्या माणसाला challenging वाटली. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की एवढा अजस्त्र हत्ती फक्त एका दोरखंडाने बांधला होता. ते ही एका पायाला तेवढा दोरखंड होता. त्याचं कुतूहल वाढलं. त्याने पाहिलं की कदाचित एखादा साखळदंड असेल किंवा अदृश्य पिंजरा. पण कसलं काय... काहीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. फार कोणी नव्हतं. तेवढ्यात तिथे जवळच एक माणूस गवत कापताना दिसला. त्याने त्या गवत कापणाऱ्या माणसाला विचारलं, “काय हो, हा हत्ती एका दोरखंडाने कसा काय बांधता आला. हा ते दावं तोडू शकत नाही?” ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...