दुर्योधन म्हणजेच धृतराष्ट्र याचा ज्येष्ठ पुत्र. भीमाने त्याचा पाडाव केला, त्याला मारलं आणि कौरवांवर विजय मिळवला.
धृतराष्ट्र या बातमीने हळहळला. त्याने भीमाला भेटायची इच्छा व्यक्त केली. भीम सामोरा गेला.
धृतराष्ट्र बघू शकत नसे. तो अंध होता. मात्र हे जाणून होता की भीमाने आपल्या मुलाला मारलंय. दुःख व्यक्त करण्याचा बहाणा करत त्याने भीमाला जवळ बोलावलं आणि आलिंगन दिलं. इतकी जोरात त्याने मिठी मारली आणि आपल्या मुलाला मारल्याचा राग त्याने भीमावर काढला. जवळ जवळ भीम मोडला असं त्याला जाणवलं आणि त्याने मिठी सोडली आणि आक्रोश केला की हे मी काय केलं मी तर भीमाला मारलं.
त्याचे खोटे अश्रू पाहून मात्र कृष्णाने थोडी मध्यस्थी केली. कृष्णाने जाणूनबुजून भीमाला पाठवायच्या ऐवजी भीमाचा त्याच्याच आकाराचा पुतळा समोर उभा केला होता. धृतराष्ट्र बघू शकत नव्हता. त्याने पुतळ्याला घट्ट मिठी मारून त्याचा चुराडा केला होता.
भीम वाचला. कृष्ण म्हणाला, घाबरु नका. आता भीमाला भेटा. तो गेला नाही.. जीवंत आहे.
कृष्णाने खूप सोपी गोष्ट केली होती. रागाची भावना नष्ट होऊ देण्यासाठी तो पुतळा समोर नेला होता. पहिली वाफ जाऊ दिली होती. मग नंतर रागाच्या भावनेची तीव्रता कमी झाल्यावर भीमाला समोर केलं होतं.
अनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.
"ठंडा कर के खाओ।"
म्हणजे आपलंच तोंड भाजत नाही.
- वरुण भागवत
- वेळ: थंड करून खाण्याची!
👍👌
ReplyDeleteWow superb sir
ReplyDeleteMastch!
DeleteMast
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteसहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय ���� अप्रतिम ����
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!!
Deleteसहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय.. अप्रतिम...
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteKhup Chan sir
ReplyDeleteअनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.
सुंदर
ReplyDelete