Skip to main content

Posts

स्वयंप्रकाशी तारा...

  A click by : Varun Bhagwat सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो? त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे. मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का? किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का? त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का? सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.) विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धा...

सुट्टी

A click by- Varun Bhagwat (pic name- Ray of hope) निशिकांत सकाळीच थोडासा पडलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघाला. नीट हाय, हॅलो, बाय, असं काहीच त्याच्या पत्नीशी न करता त्याचा दिवस सुरू झाला. कामावर पोचला, मन लागेना. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं. तसं ह्याचं मन घरीच राहिलं होतं. ते सगळं बॅड मूड वालं बॅगेज घेऊन तो कामावर आला होता. काम धड होईना, तिची आठवण होऊन उपयोग पण होईना. त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ तारीख होती. घड्याळात ९.०० वाजले होते. बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं. "येऊ?" निशिकांतने दरवाजा हलकेच ढकलत विचारलं. नुसतं फाईल कडे बघत हातानेच "कम इन" असं न म्हणता बॉस छान हसला, म्हणाला, "या, आत या. बसा." निशिकांत खुर्ची मागे सारत सरांसमोर बसला. "ऑल वेल?" बॉसचा प्रश्न. "हां." निशिकांतचं उत्तर. "वाटत नाही....

आठवणी- हवेहवेसे त्रास

  A click by: Varun Bhagwat "आठवणी." "त्यांचं काय?" "या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये." "का लावून घेऊ नये?" "त्रास देतात या आठवणी." "अगं, याच आठवणी जगवतात. याच आठवणी जगण्यात मजा आणतात. याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात. आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात." "हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते." "हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपा...

जे नकोय ते बाजूला कर!

A click by: Varun Bhagwat "सुचत नाहीये." "काय?" "काहीच नाही." "असं का?" "माहीत नाही." "मला माहितीये." "मनकवडा आहेस का?" "हाहा..." "हसू नको. उत्तर दे." "सुचत नाहीये म्हणजे छान किंवा नवं काही सुचत नाहीये. बरोबर?" "हो." "कारण तुझं मन बाकी विचारांनी preoccupy झालंय." "As in?" "आधीच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, पण बदलणं तुझ्या हातात नाही त्या विचारांनी अस्वस्थ झालायस. किंवा इतरही demotivating thoughts मनात घोळतायत." "हं. पण मग करू तरी काय?" "सोड." "असं कसं सोड?" "तू ज्याचा विचार करत आहेस ते केवळ विचार करून बदलेल?" "नाही." "तू नुसताच गप्प बसून राहिला आहेस का?" "नाही. मी try केला काही प्रमाणात जे पटत नाही ते बदलण्याचा. थोडा demotivate झालो तर स्वतःला push करण्याचा." "आणि?" "थोडं बदललं." "Good." "Good काय? बाकीचं..." "सगळ...

असं वागतात का?

A click by: Varun Bhagwat कुत्र्याचं पिल्लू बागेत बागडत होतं. इलुसं पिल्लू, सगळ्याच नव्या गोष्टींचं त्याला आकर्षण. ह्या जगातली प्रत्येक पहिल्यांदा दिसणारी गोष्ट जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतंय असं वाटत होतं. त्या पिल्लाला पाहिलं. मित्राकडे बिस्कीट होतं. त्याने पटकन ते बिस्कीट मला देत त्या पिल्लाला खाऊ घालायची खूण केली. कोणालाही पटकन आवडावं इतकं ते गोंडस पिल्लू. मी पटकन त्याला बिस्कीट दिलं. उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून आधीपासून मला एक मोठा कुत्रा दिसत होता, तो ही रोज तिथेच खेळायचा. त्याचं नाव टॉमी. मी त्या पिल्लाला बिस्कीट दिलेलं त्याने पाहिलं. थोडा वेळ त्याने वाट पाहिली. त्याला देण्याकरता दुसरं बिस्कीट घेण्यासाठी मी वळलो. पण तो अचानक धावत आला. बिस्किटाजवळ असणारं ते पिल्लू दचकून बाजूला झालं. टॉमीने बिस्किटाचा ताबा घेतला. कसं असतं ना! पिल्लू दुर्बळ आहे म्हणून पटकन त्याचं बिस्कीट उचललं. हे कितपत योग्य? पिल्लू काही प्रतिकार करण्याइतकं मोठंसुद्धा नव्हतं. त्याच्यासवे त्याचे आई बाप पण नव्हते. एकटं पडलं होतं. आशाळभूत नजरेने पाहत होतं, एकदा टॉमीकडे आणि एकदा माझ्याकडे. टॉमीसाठीच बिस्कीट घ्यायलाच...

किती पाहावी वाट...

  A click by: Varun Bhagwat कातरवेळ. सूर्य उदास आहे असं वाटत होतं. Bike वर जाणारा मी मित्रासोबत होतो. Highway वर चहाची टपरी दिसली. नकळत गाडी बाजूला घेतली. तिथेच एक बाकडं दिसलं. बसलो. २ कटिंग सांगितले. मित्राने सहज गाणं लावलं.  पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी लिहून संगीत दिलेलं गाणं. शब्द ऐकले. "तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट!" या पहिल्याच ओळीने गाण्यात बुडून गेलो. तिथून खूप खूप दूर असणाऱ्या माझ्या तिच्यापर्यंत पोहोचलो. दूर असून खरंतर कसा तिच्यापर्यंत पोहोचलो? हो, शरीराने दूर होती, पण गाणं तिच्या जवळ नेत होतं. खरंतर नाही, बहुधा जवळ आणून तिच्यापासून पुन्हा दूर करत होतं. कारण लगोलग भेट होणं शक्य नव्हतं. वाटलं, माझ्या एका हाकेसाठी वाट पाहतेय का ती?? स्वतःला प्रश्न केला, मी हाक मारत नव्हतो का? जाणवलं की ती किती वाट पाहत असेल. कामानिमित्त कित्येक दिवस तिच्या भेटीविना जातात. तिची आठवण तर रोज होते. हाक मारायचं राहून जातं. ती वाट पाहत असेल. आलो नाही हे पाहून अश्रू गालावर ओघळू देत असेल. खिडकीतून तिला चंद्र दिसतो, तो निरखत असेल. चंद्र कळा बदलतो. कधी वाढत जात...

काय बदललं? फक्त कॅलेंडर?

A click by: Sushil Ladkat काय बदललं? फक्त कॅलेंडर! रोजचा सूर्य तसाच उगवला आहे. सुर्यास्तसुद्धा तसाच, सकाळ तशीच आहे. काय बदललं? फक्त कॅलेंडर! गरमागरम चहानेच दिवसाची सुरूवात होत होती, आजही तशीच होते आहे. काहींचा आळसाने दिवस सुरू व्हायचा, काहींचा उत्साहाने. आजही तेच घडतंय. मग काय बदललं? केवळ कॅलेंडर! वर्तमानपत्रात काल बातम्याच आल्या होत्या, आजही बातम्याच आल्या आहेत. केवळ वर्तमानपत्रावरील तारीख बदलली, वर्ष बदललं. काल ३१ तारीख होती, आज १. दर महिन्यात असतं हे, मग बदललं काय? फक्त कॅलेंडर! आजूबाजूला असणारी माणसं तीच आहेत, रोजची कामं तीच असणार आहेत. काय बदललं? फक्त कॅलेंडर! दिवस २४ तासांचाच राहिलाय, कामाची वेळही तीच राहिलीय. काय बदललं? फक्त कॅलेंडर! . . कष्ट तितकेच आहेत, त्यात काही बदल नाही. रोजची काम तीच आहेत, रुटीन तसंच आहे. बदललं काय, केवळ कॅलेंडर! . . सगळं खरंय, पण माणसाला काही ना काही बदल घडलाय किंवा घडेल (चांगला) हे वाटण्याची संधी आहे हे बदलणारं कॅलेंडर! सूर्य तोच असला तरी उत्साह नवा आहे असं सांगतं हे कॅलेंडर! कॅलेंडर फक्त बदलत नाही, जुनं जे नको आहे ते विसरुन पुढे जायला शिकवतं. जे चांगलं ...