शब्द बोलला. बोलून गेला. मग जाणवलं, चुकला. का बोलला? उगाच बोलला. खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते. शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते. कधी कधी ठरवून वार होतो, कधी चुकून वार होतो. कधी कठोर शब्द वापरावे लागतात. कधी नकळत वापरले जातात. याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात. शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं. हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो. शब्द नकळत घाव घालतात. हेच शब्द घाव भरून काढतात. शब्द ओले, शब्द कोरडे. शब्द शहाणे, शब्द वेडे. शब्द जोडले तर वाक्य. वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद. संवाद एकतर बरा किंवा वाईट. संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो. शब्दाची ताकद मोठी असते. ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते. शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात. अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमि...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...