Skip to main content

प्रत्येकाचे दिवस येतात...

 

A click by: Sushil Ladkat

अमोल घरी होता. अमोलचे वडील पुस्तक वाचत बसले होते. अमोलचा एकूणच mood काही ठीक दिसत नव्हता. बाबांना ते जाणवत होतं.

“बेटा”

“हां बाबा..”

“All well?”

“हं...”

“नक्की?”

“हो... असं का विचारताय?”

“सहजच.”

“हं.”

 

बाबा पुन्हा पुस्तक वाचण्यात मग्न झाले. अमोलला राहवेना.  

 

 “बाबा”

“काय रे?”

“आज संजय भेटला.”

“तुझा शाळेतला मित्र?”

“हो.”

“मग तू तर खुश व्हायला हवं.”

“कसलं काय?”

“का रे?”

“त्याचं वागणं बोलणं फार छान नाही वाटलं. त्यामानाने अगदी लवकर त्याने त्याच्या क्षेत्रात प्रगती केल्याने असेल कदाचित असं वागणं.”

“इतका लवकर तो वरच्या पदावर पोचलाय तर मग तर त्याने खूप नम्र असलं पाहिजे.”

“पण it’s exactly opposite.”

“Oh.. ते ठीके पण त्याची प्रगती झाली आहे तर तू का उदास होतोयस?”

“त्याच्या प्रगतीमुळे नाही हो. पण तो बाकीच्यांना आणि अगदी त्याच्या मित्रांना असं कमी लेखतोय त्याचं वाईट वाटतंय. आजच्या भेटीत स्वतःचीच टिमकी बडवत होता, ते ही मी आणि प्रीतम होतो, तर आम्हाला कमी लेखून.”

“आयुष्य आणि त्यातले चढउतार त्याने नाही बघितले अजून. तू नको दु:खी होऊस. एक दिवस येईल त्याचं डोकं ठिकाणावर. आयुष्यच धडा शिकवतं अशा परिस्थितीत.”

“म्हणजे?”

“म्हणजे त्या घोडा आणि गाढवासारखं. एकदा एक गाढव चाललं होतं. त्याच्या पाठीवर ओझं होतं, जशी तुझ्या पाठीवर जबाबदारी आहे.”

“म्हणजे मी गाढव?”

“तसं नाही. तुला relate करायला सोपं जावं म्हणून रे आणि गाढव असण्यात वाईट काय आहे?” बाबा मस्करी करत म्हणाले. “हां, तर रस्त्यात घोडा भेटला, मोठ्या तोऱ्यात त्याला धक्का मारून निघून गेला, तुझा मित्र संजय जसा वागला अगदी त्याच्या सारखा! गाढवाला वाईट वाटलं.”

“गाढव काही बोललं?”

“नाही.”

“काही दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झाली. आज गाढव थोडं relax होतं. तर समोरून तोच घोडा जाताना दिसला. आज त्याच्या पाठीवर ओझं होतं. गाढवाला मस्त chance मिळाला होता बोलायचा.”

“मग?”

“पण ना ते काही बोललं नाही. त्याने उलट घोड्याची मदत केली.”

“हे अती झालं.”

“तू पण अती कर असं म्हणत नाहीये मी. पण ना त्या गाढवाला माहित होतं प्रत्येकाचे दिवस येतात. अशावेळी एकमेकांना चिडवण्यात, खिजवण्यात, कमी लेखण्यात वेळ घालवण्यापेक्षा एकमेका सहाय्य केलं तर जास्त सोपं होतं. तुला काय वाटतं?”

“हा चांगुलपणाचा अतिरेक झाला.”

“हाहा... पण बघ, आहे की नाही गाढव चांगलं. आपण त्याला उगाच बदनाम केलंय. लक्षात ठेव, प्रत्येकाच्या पाठीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ओझं असतं. दिवस सुद्धा प्रत्येकाचे येतात. त्यामुळे भविष्यात तू वरचढ ठरलास तर त्याला मदत करायची अथवा नाही करायची हे तू ठरव. पण त्याला कमी लेखू नकोस. कारण त्याच्यावर सुद्धा जी परिस्थिती ओढवली असेल त्याला काही ना काही कारण असेल. दिवस प्रत्येकाचे येतात.”

A Click by: Sushil Ladkat
 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

कर्माचं Circle

A Click by- Sushil Ladkat एक होता उंदीर आणि एक होता बेडूक. यांची झाली मैत्री. थोडं odd होतं हे combination. उंदीर बिचारा भोळा आणि बेडूक थोडा लबाड. हा बेडूक उंदराशी वाट्टेल तसं विचित्र वागायचा आणि त्याचं त्या बेडकाला कधीच काही वाटायचं नाही. त्याला तो कायम कमी लेखायचा. उंदीर त्याचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची त्याला खात्री होती आणि हे बऱ्यापैकी खरं सुद्धा होतं. उंदीर कधीच काही बोलायचा नाही. असली मैत्री तरी का असावी असा एक प्रश्न कोणालाही पडला असता. पण ज्याला पडायला पाहिजे त्या उंदराला तो पडत नव्हता. पर्याय नसल्यासारखं , जगातले इतर मित्र संपल्यासारखा तो घाबरून का होईना त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे बेडकाचं असं बेदरकार वागणं वाढू लागलं. एक दिवस तर बेडकाने कहर केला. त्याला उंदराची अतीशय नीच दर्जाची मस्करी करायची लहर आली. त्याने उंदराचा पाय स्वतःच्या पायाला बांधला आणि उड्या मारत फेरफटका मारायला निघाला. उंदीर फरफटत त्याच्या सोबत ओढला जाऊ लागला. डबकं तर बेडकाची अतीशय लाडकी जागा. त्याने उंदराचा आणि बाकी कसलाच पुढचा मागचा विचार न करता डबक्यात उडी टाकली. स्वतः मस्तपैकी पाण्यात खेळू ल...

Confidence आणि Overconfidence

A click by - Varun Bhagwat एक होता राजा त्याची खुशीत होती प्रजा! दरबारी आला मूर्तीकार, म्हटला माझ्यासारखे दिसणारे पुतळे बनवेन मी हजार! सगळ्यांना ऐकूनच वाटला हा चमत्कार, गर्वाने फुलून मूर्तीकार म्हणाला , " अशक्य आहे माझी हार!" हे सगळं नाटक संपल्यानंतर राजा म्हणाला , " इतका विश्वास आहे स्वतःवर ?" मूर्तीकार हसत म्हणाला, " मी माझ्यासारखे दिसणारे ९९९ पुतळे बनवेन आणि त्या पुतळ्यांमध्ये मी स्वतः जाऊन उभा राहीन. तुम्हाला त्या सर्वांमधून मला शोधून काढावं लागेल.” “मान्य!” राजा म्हणाला. मूर्तीकाराने अगदी हुबेहूब पुतळे बनवले. त्या सर्व पुतळ्यांना सारखी वेशभूषा आणि एक उभी राहण्याची विशिष्ट पद्धत देऊ केली. तशाच पद्धतीत आणि वेशभूषेत तो त्यांच्यात मिसळून उभा राहिला. राजाला बोलावलं गेलं. राजाने सगळ्या पुतळ्यांचं वेशभूषेसकट निरीक्षण केलं. राजाला त्याच्या skills चं आणि कलेचं कौतुक वाटलं, मात्र राजाला त्याची बोलण्याची पद्धत पटली नव्हती. मूर्तीकाराला त्याच्या skills चा अभिमान असता तर ठीक पण त्याला तर गर्व झाला होता. अभिमान असणं आणि स्वत:च्या कलेबाबत confident असणं उत्तम. पण o...