मनोज आज त्याच्या psychologist कडे गेला. एकूणच routine बोलणं झाल्यानंतर dr. साटम यांनी एकच प्रश्न विचारला- “राग पटकन येतो ना तुम्हाला Mr. मनोज?” आपल्या रागाचा आपल्याला फार अभिमान आहे अशा थाटात मनोज उत्तरला, “अर्थात.” खरंतर राग येणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. पण मनोज मात्र आपल्या रागाचं समर्थन करत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे dr. साटम यांना जाणवलं. ते शांत होते. मनोज बोलत होता, “मी रागावतो , मान्य आहे. पण आता समोरचा चुकतो किंवा कधी नाही घडत गोष्टी मनाप्रमाणे. मग येतो राग.”
“यावर काही उपाय असावा किंवा करावा असं नाही वाटत का मग तुम्हाला?” dr. साटम यांनी प्रश्न केला.
“रागावर उपाय असतो?” मनोजचा प्रतिप्रश्न.
“ठरवला आणि योजला तर असतो.” साटम उत्तरले.
“सांगून बघा मला. Try करण्याचा try करेन.” स्वत:च्याच उत्तरावर मनोज खुश झाला.
डॉक्टरांनी काहीच react केलं नाही. त्यांनी मनोजच्या हातात फक्त एक चिट्ठी दिली. मनोज चिट्ठी घेऊन निघून गेला. त्याने ती चिट्ठी तिथे तरी उघडून बघितली नाही. घरी आला. नेमके त्याच दिवशी त्याचे त्याच्या पत्नीसोबत अगदी क्षुल्लक कारणावरून मतभेद झाले. मनोज काहीतरी तिला लागेल असं बोलला होता, हे त्याला थोडं का होईना, जाणवलं. अजूनही त्याने चिट्ठी उघडली नव्हती. पण या घटनेनंतर तो घराचं दार जोरात आपटून बाहेर मोकळ्या हवेवर गेला. त्याला चिट्ठीची आठवण झाली. त्याने खिसा चपापला.
चिट्ठी उघडली. वाचू लागला. त्यात लिहिलं होतं- या चिट्ठीत एक गोष्ट आहे. एकदा सहज म्हणून वाचा. कदाचित कुठेतरी फायदेशीर ठरू शकते. एक होता १४ वर्षांचा मुलगा. खूप हट्टी होता. नुसता हट्टी नाही, थोडा रागीट पण होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा, भांडायचा. रागाच्या भरात कोणालाही, काहीही बोलायचा. त्याच्या बाबांनी ठरवलं की यावर काहीतरी उपाय योजला पाहिजे. हा असा राग बरा नाही.
एक दिवस बाबा त्याला म्हणाले, “बाळा. तुला राग येतो ना?”
“हो.” मुलगा उत्तरला.
“बरं. एक काम करशील?”
“रागवायचं नाही असं सांगू नका.”
“नाही, मी असं काही म्हणालो का?”
“नाही.”
“मग?” मुलाने प्रश्न केला.
“तू बिनधास्त चीड, रागाव. तुझं तुला कळेलच की आपण चिडलो आहोत. तुला कशाचाही, कोणाचाही राग आला तर एक काम करायचं.” असं सांगत बाबा त्याला त्यांच्या अंगणात, घरातल्या बागेत घेऊन गेले. बागेच्या कुंपणाचं काम चालू होतं. बाबांनी तिथे एक लाकडी फळी आणली होती. मुलाच्या हातात हातोडी आणि खिळ्याचा बॉक्स देत ते म्हणाले, “तुला राग आला की ही हातोडी आणि यातला एक खिळा घ्यायचा आणि तो या लाकडी फळीवर ठोकायचा.” मुलाला गंमत वाटली.
तो चिडायचा, रागवायचा. मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे खिळा घेऊन हातोडीने त्या लाकडी फळीवर ठोकायचा. असं अनेक दिवस चाललं. लाकडी पट्टी खिळ्यांनी भरून गेली. एक दिवस मुलगा खेळाच्या mood मध्ये होता. बाबांना ती संधी योग्य वाटली. ते म्हणाले, “आता हे ठोकलेले खिळे एक एक करून काढून टाक. मुलाने ऐकलं. बाबांनीही ते काढायला मदत केली. बाबा सांगू लागले, “आता ही लाकडाची फळी बघ. पूर्वीसारखी राहिली का रे?” मुलगा म्हणाला, “पूर्वीसारखी म्हणजे?”
“तू खिळे मारलेल्या जागी काय झालं?” बाबांनी प्रश्न केला.
मुलगा थोडा विचार करत म्हणाला, “तिथे छिद्र पडली.”
बाबा म्हणाले, “खरंतर मारलेले खिळे तू पुन्हा काढून टाकलेस. तरी छिद्र तशीच राहिली.”
“बाबा, एकदा खिळा ठोकला म्हणजे पुन्हा तो काढला तरी तिथे फळी damage होणारच ना?”
“Exactly my point. जेव्हा आपण कोणाला तरी बोलतो, तेव्हा त्याच्या मनावर पण असाच आघात होतो. तिथे खिळा नसतो, त्यामुळे आघात आणि त्यामुळे झालेलं damage दिसत नाही. पण त्या व्यक्तीच्या मनात आपण बोललेले वाईट शब्द राहतात. पटकन जात नाहीत.”
“Sorry बाबा.” असं म्हणत मुलगा बाबांना बिलगला.
गोष्ट वाचून पूर्ण झाली. मनोजने चिठ्ठीची घडी घातली. घरात गेला. त्याची पत्नी चहाची तयारी करत होती. तो म्हणाला, “मी करतो चहा.” ती काही न बोलता जाऊ लागली. मनोजने तिला थांबवायचा प्रयत्न केला. ती hall मध्ये जाऊन बसली. त्याने चहा केला. कप टी-पॉयवर नेऊन ठेवला. कोणी काहीच बोलत नव्हतं. तिने कप उचलला. कप उचलताच तिचा पडलेला चेहरा थोडा बदलला. कपाच्या खाली छोटी चिट्ठी होती- Sorry!
ती मनाशीच हसली. नजरेने मनोजला शोधत होती. मनोज डॉक्टर साटमला मनातूनच thanks म्हणत तिच्यापाशी आला. आता कुठे तो तिच्या नजरेतून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता.
वरुण भागवत

Comments
Post a Comment