![]() |
| A click by Sushil Ladkat |
Come back किंवा bounce back करणं हे फार risky , अवघड पण तितकंच challenging आहे. तसं म्हणलं तर कोणती गोष्ट अवघड नाही?? एखादी गोष्ट प्रथमच करून पाहणं किंवा एखाद्या नव्या गोष्टीत पदार्पण करणं कदाचित तुलनेनं सोपं! पण हे bouncing back प्रकरण आपला जीव काढतं.
नवं सुरु करणं आणि पुन्हा नव्याने सुरु करणं यात दिसायला खूप छोटा फरक दिसतो. तो फरक म्हणजे फक्त 'पुन्हा' या शब्दाचा! दिसायला छोटा पण असायला फार मोठा आहे हा फरक!
नवं सुरु करणं is like नवा संसार उभारणं, ज्याला कष्ट पडतात. स्वाभाविक आहे. नवंच आहे ना ते! पण नव्याने सुरु करणं म्हणजे मोडलेला, पडलेला संसार पुन्हा उभारणं! बघणाऱ्याला वाटतं या आधी हे त्याने केलंय , नव्याने करायला तितकेसे कष्ट नाही पडणार! पण किंबहुना थोडे जास्तच कष्ट पडतात!
जसा एखाद्या चांगल्या batsman चा form हरवतो आणि तो team च्या बाहेर फेकला जातो. पुन्हा team मध्ये येण्यासाठीचा त्याचा struggle बघण्यासारखा असतो.. नवख्या माणसाने शिकण्यासारखा असतो. कारण यात emotions चा कल्लोळ असतो. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःबद्दल वाढलेल्या अपेक्षा, आधीचं failure, फार न मिळणारी संधी, limitations आणि weaknesses वर लोकांनीच दिलेला भर, या सगळ्याचं एकत्रित pressure आणि हे सगळं सांभाळून perform करायचं. चेष्टा आहे होय?
ज्याला जमतं तोच खराखुरा phoenix पक्षी!
हे करणं खरच challenging आहे. हे येरागबाळ्याचे काम नोहे!
पडल्यावर स्वतःच स्वतःलाच
Yes, I am going to bounce back
असं म्हणून या लढाईला सुरूवात तर निश्चित करता येऊ शकते. कारण हे bounce back खूप वेळा करावं लागतं, अगदी छोट्या गोष्टीतही.
ध्येय लांब असलं तरी रस्ता मदत करत राहतो तिथवर पोहोचायला. Come back करण्याचं धैर्य आणि इच्छा दोन्ही महत्त्वाचं!
मग आता आलंच आहे वाट्याला तर let’s embrace that struggle and bounce back with double power.
-वरुण भागवत

Comments
Post a Comment