Skip to main content

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

 

A click by Varun Bhagwat


रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही. 


परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात. 


या सगळ्यात एक समान दुवा असा की हे जे सर्व घडतं ते 'कर्माने' घडतं. कर्म या गोष्टीला पाठिंबा द्यायला कृष्णासारखा पाठीराखा नाही. कृष्णमय होताना हे जाणवतं की आपण कुठे जन्माला आलो या पेक्षा आपण जगाचा निरोप घेताना या दुनियेला काय देऊन गेलो किंवा काय कर्म करून गेलो हे महत्त्वाचं. कारण कर्म ही गोष्ट आपल्या हातातली आहे. जन्म कुठे, कसा आणि कधी होईल हे हातात नाही. मृत्यू वर माणसाचं नियंत्रण नाही. हे दोन्ही निसर्गदत्त. मधला प्रवास निसर्ग आणि दत्त शोधण्याचा. कसा? तर कर्म करत. कर्म आणि कष्ट यांना अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या कृष्णाने तर फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा असं सांगितलं. अवघड परिस्थितीतून मार्ग काढताना सुद्धा दुसऱ्यावर नुसतं विसंबून राहून गोष्टी आपोआप घडत नाहीत. स्वतः कष्ट करावे लागतात. कार्यरत राहणं गरजेचं असतं. 


माणसाचं एकदम त्राण निघून जातं. वाटतं, आता काही जमणार नाही. पण थोडं थांबून पुन्हा प्रयत्नशील राहणं आपल्याला यशाकडे नेतं. 


करत राहणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं असं म्हणतात. पण रडत बसून, नशिबाला दोष देत घडत काही नाही. मनगटात ताकद नसेल तर मिळवावी. मिळवली की मग तिचा सदुपयोग करत कर्म करत राहावं. बसल्याजागी सहजा सहजी कोणालाच काही मिळत नाही, मिळालंच तरी ते टिकत नाही. कष्टाने मिळवलेलं चाखायला सुद्धा मजा येते.


आपण आत्ता या क्षणी कुठे आहोत यावरून आपण कोण आहोत हे ठरत नाही. आपण कुठे पोहोचण्याचा विचार करतो आणि त्या दृष्टीने पावलं उचलतो ते खरे आपण!


  • वरुण भागवत

Comments

  1. कर्मयोग गीतेचा तिसरा अध्याय बरोबर सांगितलंस

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...