मित्रासोबत बाईकवरून चाललो होतो. सिग्नलला गाडी थांबली. आमच्यासोबत अनेक गाड्या थांबल्या. सिग्नलची ती २ मिनिटं नुसतंच थांबणं हा एक कार्यक्रमच असतो. नजर इकडे तिकडे वळत राहिली. तोच एका बाईकवर एक कुटुंब दिसलं. मित्र फोटोग्राफर असल्याने मित्राचा कॅमेरा लगेच फोटो काढायला पुढे सरसावला. त्याने लगेच फोटो दाखवला सुद्धा आणि म्हणाला, जरा ही प्रतिमा (हा फोटो) निरनिराळया दृष्टिकोनातून पाहू. A click by: Sushil Ladkat मग विचारचक्र धावू लागलं. अनेकविध दृष्टिकोनातून ती प्रतिमा पाहू लागलो. मग निरनिराळी निरीक्षणं टिपली ती अशी: १. म्हटलं तर एक सुखी कुटुंब २. कदाचित एका दुचाकी वरती ३ जण म्हणजे अडचण! ३. त्या मुलामध्ये अनेक जण स्वतः चं बालपण शोधू शकतात. लहानपणी असे पुढे उभे राहणारे आपण, आपल्यासाठी ती तडजोड नव्हती तर पुढे उभं राहणं हा विजय होता. ४. त्या दोघांचे आविर्भाव असे की लगबग आणि वर्दळ असली तरी ती रोजचीच आहे. ५. ती इकडे पाहते आहे आणि तो तिकडे! आयुष्य दोघांना वेगवेगळ्या वाटांनी नेऊ पाहतं आहे. पण त्यांना जोडणारं अपत्य त्यांना थांबवत आहे. ६. कदाचित मुलगा आता थोडा मोठा होतोय आणि असं पुढं उभं राहणं त्याला...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...