| A Click by: Sushil Ladkat |
“संकट कसं येतं?”
“कसं येत म्हणजे?”
“सांग ना.”
“सांगता येत नाही.”
“काय सांगता येत नाही?”
“संकट कसं येईल हे सांगता येत नाही.”
“मी जगावर येणारं संकट किंवा unprecedented
संकट असल्या संकटांबद्दल बोलत नाहीये.”
“मग?”
“संकट येऊ शकतं असं वाटत असेल तर किंवा काही
काळंबेरं आहे असं वाटत असेल तर काय करू शकतो आपण?”
“असं होय. Then reframe your question.
थोडक्यात तुला जाणून घ्यायचं आहे की संकटाची चाहूल घेणं म्हणजे काय असतं?”
“हं... kind of yes.”
“हे बघ असं काहीच वेगळं करू नाही शकत आपण.
Alert राहावं लागतं कायम बाकी काही नाही.”
“Alert राहायचं म्हणजे काय?”
“म्हणजे आजूबाजूला नजर असली पाहिजे. प्रत्येक
वेळी आपलाच अनुभव कामी येतो असं नाही. दुसऱ्याच्या अनुभवाने सुद्धा मनुष्य शहाणा
होऊच शकतो. किंवा त्याचं निरीक्षण त्याला संकटापासून वाचवू तरी शकतं किंवा सावध
तरी करू शकतं. पण हा प्रश्न अचानक का पडला रे तुला?”
“अरे दादा काय सांगू, सहज जेव्हा observe
करतो तेव्हा जाणवतं आणि मला ना काही माणसांची गंमत वाटते. तोंडावर गोड असतात आणि
आत वेगळंच. अशा वेळी काय करायचं, त्यांच्याशी वागायचं कसं? की तोंडाला लागायचंच
नाही त्यांच्या?कळत नाही. यांना भेटणं हे सुद्धा संकट असतं कधी कधी. वागावं कसं?”
“तो निर्णय परिस्थितीजन्य असला पाहिजे.”
“म्हणजे?”
“म्हणजे असं की त्या smart कोल्ह्यासारखं
वागता आलं पाहिजे.”
“कुठला कोल्हा?”
“एकदा काय झालं, एक सिंह आजारी पडला. सगळे जण
मग त्याची चौकशी करायला जायचे. सिंह दुबळा झाला असं सगळ्यांना वाटलं. तो सगळ्यांशी
गोड गोड बोलायचा. चौकशी करायला एकदा कोल्हा गेला. आता बघ हां, smart कोल्ह्याने
आधी अंदाज घेतला. एक छोटं analysis करता आलं पाहिजे.”
“म्हणजे? काय केलं त्याने?”
“कोल्ह्याने थोडे डोळे उघडे ठेवून निरीक्षण
केलं. त्याला कळत नव्हतं, सगळ्यात भयंकर शिकारी अर्थात सिंह हा दुबळा होईल का?
ठीके, झाला तरी उगाच गोड बोलेल का? की म्हणूनच गोड बोलेल? गोड बोलून त्याचा फायदा
काय? ही फसवणूक तर नाही ना? हे सगळे प्रश्न कोल्हयाने स्वत:ला विचारले आणि गुहेच्या
बाहेरच थांबून त्याने सिंहाच्या तब्येतीची चौकशी केली. सिंह म्हणाला, “मी ठीक ठाकच
आहे. पण तू मला भेटायला आत का येत नाहीस?” कोल्हा म्हणाला, “आलो असतो, पण या गुहेत
आत जाणारी पावलं दिसतायत. बाहेर येणारी नाही.”
“Wow...”
“याला म्हणायचं संकटाची चाहूल लागणे. अंदाज
घेता आला पाहिजे.”
“पण प्रत्येक वेळी अंदाज योग्यच असेल असं
नाही.”
“म्हणूनच त्याला अंदाज असं म्हणतात. अंदाज
चुकू शकतो, त्यातून आपण शिकू शकतो. पण analyze करता आलं पाहिजे. विचार न करता एकदम
काहीतरी करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं. कोल्ह्याला पण कुठेतरी अनुभव आला असेल
म्हणून तर तो smart झाला असेल.”
“हं... थोडक्यात काय... आपले डोळे उघडे असले
पाहिजेत... मग अंदाज घेता येतो धोका आहे, संकट आहे की आपल्याला हवी अशी परिस्थिती
आहे.”
“Yes.”
- वरुण भागवत
Khup chhan.Nehmi Savadh rahayala pahije.
ReplyDeleteMasta!
ReplyDeleteKharay varun sir
ReplyDeleteआयुष्यात प्रत्येकाने सतर्क असलेच पाहिजे 👍👍👍
ReplyDeleteGreat. Very clever. It's need of time.
ReplyDelete