| A Click By: Varun Bhagwat |
आदित्य सरळ
रस्त्याने आपल्या वाटेने चालत होता. बराच वेळ तो चालत होता, अथक! थांबून कसं
चालेल? ठरवलेलं लक्ष्यतर
गाठायचं होतं. पण त्याचे पाय अचानक चालता चालता थांबले. त्याला जाणवलं की तो एकटा
नाहीये.
कोणीतरी जवळ आलं आणि त्याला म्हणालं, "काय झालं?"
आदित्य म्हणाला, "कुठे काय?"
"मग चालता चालता
थांबलास का?" त्याचा प्रश्न आला.
"अचानक अनपेक्षित असं
काहीतरी समोर आलं." आदित्य उत्तरला.
"अनपेक्षित?"
"हो."
"म्हणजे नेमकं काय?"
"बघ ना, समोर तुलाही दिसतोय
ना, केवढा मोठा डोंगर
उभा आहे."
"हा डोंगर तुला
अनपेक्षित होता?"
'अर्थात."
"असं का बरं?"
"इतका वेळ सरळ रस्ता
होता, मी ही चालत होतो."
"सरळ रस्ता किती वेळ
असणार? हा डोंगर कधी ना कधी
समोर उभा ठाकणारच होता, तो आज उभा ठाकला."
"पण अपेक्षा नव्हती
असं काही असण्याची."
"एखादा सिनेमा तू
बघतोस आणि त्याचा शेवट जर कोणालाही लगेच कळेल असा झाला तर तू काय म्हणतोस?"
"हेच की खूप predictable होता end!"
"Predictable असेल तर मजा येते का?"
"नाही."
"आयुष्याचं तसंच आहे.
घडणारी पुढची प्रत्येक गोष्ट जर Predictable
असेल तर bore होऊन जाईल आयुष्य!"
"पण अवघड आहे यार, हा डोंगर कसा पार
करायचा?"
"दुसरा पर्याय आहे?"
"खरंतर नाही. I mean पुढे जायचं असेल तर
डोंगर पार करण्याशिवाय पर्याय नाही."
"झालं तर मग! कधीकधी
ना हे बरं असतं."
"काय?"
"पर्याय नसला की जे
आहे समोर ते करावं लागतं. हां, ते कशा पद्धतीत करायचं याचा पर्याय मात्र आपल्याकडे असतो."
"म्हणजे?"
"काही गोष्टींना इलाज
नसतो. त्या कराव्या लागतात. फक्त त्या हसत करायच्या की रडत हे आपलं आपण ठरवावं
लागतं. मान्य आहे समोर डोंगर आहे तुझ्या! पण एक नक्की, आपण नुसतं करायची
म्हणून एखादी गोष्ट नाही करणार आहोत. ती का करायची हे समजून घेणार आहोत. डोंगराला
अडचणीऐवजी संधी बनव."
"त्याने काय होईल?"
"डोंगर चढताना दम कमी
लागेल. त्या सोबत आपण हे का करतोय ह्याचा विचार कर."
"म्हणजे?"
"म्हणजे डोंगर चढल्यावर
जे सुंदर दृश्य दिसेल त्याला कसलीच तोड नसेल. त्याचा विचार कर. हे कष्ट फलदायी
ठरले हे तेव्हा जाणवेल. हे लक्षात ठेवून डोंगर पार करायला लाग. जमेल!"
आदित्यला हे ऐकून थोडा धीर आला. त्याने डोंगराकडे एकदा पाहिलं.
विचारापेक्षा कृती करावी असा विचार केला. त्याने शेजारी पाहत पटकन प्रश्न केला, "आपण कोण?"
"माझं नाव धैर्य! मी
लोकांच्या मनात असलो की प्रश्न नाही. पण कोणी खचलं तर मला बाहेर येऊन असा संवाद
साधून पुन्हा त्या माणसात प्रवेश करावा लागतो. आता पुढच्या क्षणी मी तुला दिसणार
नाही, कारण मी तुझ्यात
असेन.
आदित्यने "पण" असं म्हणून मान वळवेपर्यंत ती व्यक्ती निघून गेली होती. धैर्याचा आवाज आला, "तू चालत राहा. डोंगर असो, वा सरळ रस्ता! अपेक्षित असो वा अनपेक्षित अडचण असो, मी सोबत करणार! अट एकच की तू माझी सोबत नाकारायची नाहीस!"
- वरुण भागवत
व्वा खूपच सकारात्मक... तुझ्या प्रत्येक blog मधून खूप काही शिकायला मिळतं...
ReplyDeleteमाझा आपला छोटा प्रयत्न! खूप खूप धन्यवाद!!
Delete👍👍👍👏
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chaan... Very positive 👌👌
ReplyDeleteKhupch sundar varun...
ReplyDeleteBlogs vachalyvar aase vatate ki, Pratek problems var tuzykade solutions Aahet..
Very positive energy.... 🙋
👌👌👍👍