| A click by: Varun Bhagwat |
चपळता शिकावी तर चित्त्याकडून!
कधी हा प्राणी फार जास्त सुटलाय (overweight झालाय) किंवा फार वाळलाय (underweight झालाय) असं कधी ऐकिवात आणि पाहण्यात येत नाही. हा कायमच fit!
असा हा fit चित्त जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो.
दुसऱ्या बाजूला असतो कळप! नुसता कळप नाही.. दुबळ्या प्राण्यांचा कळप.. हे असे प्राणी ज्यांना बजावलेलं असतं की बाळा कायम कळपात राहा.. म्हणजे तू safe राहशील. कळप सोडू नकोस. हे जंगल फार निष्ठुर आहे. बाळ ऐकतं. कळपात राहू लागतं... कळपाच्या pace नि त्या बाळाचं आयुष्य सरकू लागतं. निवांत.. कळपामध्ये जसे सगळे जण वागतील तसं बाळ पण वागू लागतं. त्यांच्यासोबत मिळेल ते खाऊ लागतं.
इकडे छोटा चित्ता मात्र आत्तापर्यंत वडिलांकडून बाळकडू घेऊन independent व्हायला लागलेला असतो. त्याला स्वातंत्र्याची भेट मिळालेली असते, हवं तिथे फिरण्याची मुभा असते.. पण त्या सोबत जबाबदारी आलेली असते हळूहळू स्वतःची शिकार स्वतः मिळवण्याची!
मोठा होऊ घातलेला चित्ता आपल्या एका भावंडासह निघतो शिकारीला!
इकडे कळप एकमेकांना बांधून थांबलेला असतो आणि वेळ आली की पुढे जात असतो.
चित्ता कळपाच्या जवळ येतो. त्या चित्त्याचा भाऊ शेजारीच असतो. दोघांना फक्त एकमेकांची सोबत.. पण भीतीचा लवलेशही त्यांच्या देहबोलीतून जाणवत नसतो.
कळपाला जशी चित्त्याची चाहूल लागते तसा पूर्ण २० जणांचा कळप भीतीने कापू लागतो. भय बघा केवढं त्या चित्त्यांच्या आवेशाचंच!
चित्ते जवळ येऊ लागतात.
इतका वेळ so called एकत्र बांधला गेलेला कळप आणि एकत्र सोबत राहण्याच्या आणाभाका खाणारे कळपातले प्राणी सैरावैरा धावू लागतात.
अनुभवी तर त्यांचा मार्ग (धावण्याचा) लवकर शोधतात. त्यांना बाकीचे follow करतात. कोणीही चित्त्याला भिडायची मात्र हिम्मत करत नाही हे पाहून कळपातलं कळपाचं महत्व शिकलेलं ते बाळही धावू लागतं. पण या सगळ्याला ते नवीन असल्याने त्याला मार्ग सापडत नाही. जीवाच्या आकांताने ते धावतं.. धावत राहतं .. या दरम्यान ते एकटं पडतं आणि एकटं पडल्यावर त्याला कळपाच्या महत्वाचे , safe राहण्याचे सगळे संवाद आठवतात. ते पळतच राहतं. तिथल्या तिथे... कळप बाजूला पडतो. बाळाच्या दोन बाजूला २ चित्ते.. छोटे का होईना.. पण 'चित्ते!' मार्ग block होतो.
कळपाकडे ते आशेनं बघतं. कळप काहीच करत नाही. चित्ता त्याच कळपाकडे भेदक नजर टाकतो. कळप नजर काढून घेतो आणि थोडा मागे पण सरकतो.
बाळाला लक्षात येतं की आता हा कळप काहीही करणार नाही. हे आता फक्त show बघत बसतील. बाळाचा attitude एकदम change होतो. Defensive mode बदलून attacking मोड मध्ये बाळ येतं.. हे अगदी काही क्षणात घडतं (काही बारीकसे क्षण जसे अचानक एखाद्याला mature करतात तसं काहीसं घडतं आणि प्राणी माणसांपेक्षा लवकर mature होतात.)
तर हे बाळ आता कळपाची आशा सोडतं. स्वतःची लढाई लढण्याचं बळ एकवटतं.. आणि दोन्ही चित्त्यांना पाठ होणार नाही अशा थाटात उभं राहतं कळपाला पाठ करून! जणू काही ते दर्शवत असतं आता show मी दाखवेन.. माझ्या पद्धतीत!
चित्ते नवखे असतात ही गोष्ट निरीक्षण करून बाळ हेरतं.. गळून न जाता आणि मागे न हटता ते एकदा चित्त्याच्या अंगावर जाऊ पाहतं.. चित्ता या move मुळे एकदम अचंबित होऊन मागे सरकतो. बाळाला अंदाज येतो की हा दचकला म्हणजे आपणही आता बाळ राहिलेलो नसून आकाराने मोठे आहोत आणि उंचीने तर या चित्त्यापेक्षा नक्कीच जास्त आहोत..
बाळातलं बळ वाढतं.. बाळ घाबरायचं सोडून आता त्यांनाच नडू लागतं.. छोटे चित्ते खूप प्रयत्न करतात मात्र बाळाचा प्रतिकार आणि आवेश त्यांना नवीन असतो.. या परिस्थितीचा आणि opportunity चा फायदा घेत बाळ एक जोराची ढुशी त्यातल्या एका चित्त्याला देतं.. आश्चर्य म्हणजे छोटे (नवशिके) चित्ते मागे हटतात आणि निघून जातात...
कळप जल्लोष करतो.. बाळाला अगदी डोक्यावर उचलून घेतात. बाळ मात्र शांत असतं. आयुष्यातल्या सगळ्यातमहत्वाच्या क्षणी त्याने आपल्या कळपाचं वागणं त्याने अगदी जवळून पाहिलेलं असतं.. कळप त्याला आता जवळ करत असतो. बाळ मात्र कळपाबाहेर जाऊन उभं राहतं. कळपाला पाठ फिरवून थांबतं. तर एक आश्चर्यकारक गोष्ट त्याला भासते. त्याला असं दिसतं की त्या छोट्या चित्त्याचे वडील बाळाच्या हिमतीचं कौतुक करतायत.. नि त्याला त्यांच्यात बोलावतायत..
बाळ कळपाकडे पाहतं. कळपात जायचं नाही हा निर्धार पक्का करतं.
चित्त्याची family त्याचं कौतुक करतीय असंच त्याला भासतं पण शत्रूवर विश्वास ठेवून तिथे जायला आता ते काही बाळ राहिलेलं नसतं.
बाळ या एका प्रसंगात मोठं होतं. स्वतःचे निर्णय स्वतः confidently घेऊ लागतं.
बाळ त्या सर्वांना सोडून, नव्या आणि न मळलेल्या वाटेवरून जाऊ लागतं... एकटं!
- वरुण भागवत
Masta
ReplyDeleteThanks
DeleteVery inspiring. Again the reality of life and the most needed thing for current world to sustain and stand strongly.
ReplyDeleteExcellent....🙂😊
ReplyDelete1 class in writing skill
🎉
Wa.......
ReplyDeleteConcentration on your inner voice.....
👍👍
Thanks
DeleteKhup chan
ReplyDelete