![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
Office च्या cafe मध्ये नुसतीच स्वत:च्या नादात समोर असलेली coffee ढवळत बसणाऱ्या सरिताला तिची senior प्रणाली म्हणाली, “काय गं, तोंड का पाडलंयस?
सरिता एकदम भानावर येत म्हणाली, “अं, काय?”
“झालं तरी काय?” प्रणालीने विचारलं.
“आता ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांना कोण काय बोलणार?”
“ कोणाला काय बोलणार?”
“आरती madam कडे जरा काम होतं.”
“मग?”
“त्या माझ्यापेक्षा खूप senior आहेत.”
“असतील.”
“असतील नाही आहेत.”
“मुद्दा काय?”
“त्या मला काही बोलल्या तर मी उलट उत्तर द्यायचं का?”
“मुळीच नाही.”
“घ्या. मग कसं जगायचं आमच्या सारख्यांनी?”
“हां... पण तुझी चूक नसेल तर बोलायचं.”
“उलट?”
“नाही. पण आपल्याला काय म्हणायचं आहे ते पोचलं पाहिजे. या ना त्या
प्रकारे...”
“मी तीन वेळा बोलायचा प्रयत्न केला पण she was not in a position to
listen.”
“हं. मग जरा योग्य वेळेची वाट बघायची.”
“आणि ही योग्य वेळ काय असते आणि कधी येते?”
“त्यासाठी आपण alert राहायचं.”
“अशी कोड्यात बोलू नकोस यार.”
“मग कसं सांगू?”
“ते माहित नाही. पण समजेल असं सांग.”
cafe मध्ये शेजारच्या टेबल वर बसल्या बसल्या त्यांचा colleague विकी
पेंगत होता. प्रणाली ते पाहून हसू लागली.
सरिता म्हणाली, “हसू नको यार. मला समजून सांग.”
यावर प्रणाली म्हणाली, “झोपणाऱ्या विकीला पाहून मला ती गोष्ट आठवली.
I guess it will help.”
“Tell me.”
“एक होता राजा. त्याच्या दरबारात खटला चालू होता. एका तरुणावर फार
आरोप लावले जात होते. तुझ्यासारखा बिचारा झाला होता तो. खटला अनेक दिवस चालू होता.
इतके दिवस सगळे फासे त्याच्या विरूद्धच पडले होते. आज मात्र बाजू पलटली होती. खरी
बाजू समोर येऊ लागली होती. जशी तुला तुझी बाजू मांडायची होती. पण आज राजा वेगळ्याच
stress मध्ये होता. जसे तुझे boss पण stress मध्ये असू शकतात वेगळ्याच and may be
that’s why you were neglected. या गोष्टीत अजून एक गंमत म्हणजे राजाची झोप पण
झाली नव्हती. नेमकं या तरुणाच्या बाजूने बोलणं चालू असताना राजाला भर दरबारात झोप
लागली. हां, तर झोपलेले महाराज पाहून कोणी काहीच बोलेना. कोण बोलणार ना? थोडा वेळ
शांतता. राजाला एकदम जाग आली. त्याने तडकाफडकी त्या तरुणाला फाशीची शिक्षा
सुनावली. तरुण म्हणाला, “या शिक्षेबद्दल मी तक्रार करेन.” राजा चिडला आणि म्हणाला,
“मी राजा आहे. तू तक्रार कुठे करणार?” तरुण उत्तरला, “मी झोपलेला राजा आणि जागा
असलेला राजा या दोघांच्या विरोधाभासी निर्णयाविरुद्ध तक्रार करेन. कारण यातला एक
राजा न्यायाची बाजू ऐकतो आणि त्याने मला शिक्षा दिलेली नाही. दुसरा राजा क्रूर
आहे. झोपेत निर्णय देतो.” राजाला त्याची चूक समजली, त्याने पुढील सुनावणी ऐकत
योग्य निर्णय दिला. तरुण सुटला.”
““अगं माझे boss काही झोपले नव्हते.”
“गोष्ट झोपेबद्दल नाहीये. योग्य वेळ साधण्याबाबत आहे. लक्षात घे.
कोणत्या वेळी काय बोलावं आणि योग्य वेळी आपण जर चुकीचे नसू आणि समोरचा अन्याय करत
असेल तर कशा पद्धतीत आपली बाजू आपण मांडू शकतो हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न.”
- वरुण भागवत

Waah...masta..pan hi yogya vel yei paryant khup patience thevava lagta..😜😜
ReplyDelete😀
DeleteCorrect Aahe..
ReplyDeleteKhupch Chan...