Skip to main content

Problem झालाय...

A Click by: Varun Bhagwat


"नवा दिवस, नवी सुरुवात.
नव्या दिवसाची नवी
आस.
जे चांगलं घडून गेलं
ते मनात साठवायचं.
वाईट तेवढं मनाच्या
दारातून बाहेर सोडून द्यायचं.

एक होतं गाव, त्या गावात होता एक अजब मनुष्य! दिसायचा अजब पण होता मोठा हुशार. माणसं त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायची. भोंदू बाबा नव्हता बरं तो. आजकाल तुमचे ते psychologists वगैरे असतात ना तसा काहीसा होता तो." वडील आपल्या नुकत्याच नोकरीला लागलेल्या मुलीशी बोलत होते. 

"पण याचा माझ्या problem शी काय संबंध आहे??" मुलगी मधेच तोडत म्हणाली.
"ऐक तर खरं!" बाबा गोष्ट सांगत होते, "हां, तर या माणसाकडे असेच एक दिवस काही जण सल्ला मागायला आले. याच्या सल्ला देण्याच्या पद्धती फार भन्नाट होत्या. त्याने काय केलं माहितीये?"
"काय?"

"त्याने आधी त्यांचं म्हणणं ऐकलं. घडायची ती चर्चा थोडी घडली. मग मन रिझवायला त्याने त्या माणसांना एक विनोद ऐकवला. ती माणसं पोट धरून हसली. त्यांचं हसणं विरु लागल्यावर त्याने पुन्हा विनोद सांगितला.
"मग पुन्हा माणसं हसली?"
"हो, पण थोडी कमी हसली!"
"का? Joke bore होता का?"
"नाही बेटा, त्याने पुन्हा तोच joke सांगितला होता."
"का?"
"ऐक तर. हसणं कमी झाल्यावर पुन्हा त्याने तोच विनोद सांगितला. आता मात्र माणसांनी हसल्यासारखं केलं. एकाने धीर करून विचारलं की तुम्ही सारखा सारखा तोच विनोद केल्यानंतर कसं हसू येईल?"

"Correct आहे. कोणीतरी हे विचारायला हवंच होतं. आधीच ते लोक problem मध्ये असताना हा तोच joke मारत असेल तर काय होणार लोकांचं?"
"Exactly! त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणाला, "तुम्ही जर एकाच विनोदावर सारखे हसू शकत नसाल तर एकाच problem वर सारखे का रडताय?"

सारखी त्याच त्या problem ची रट लावलेल्या मुलीला आपण उगाच त्या problem ने तोंड पाडतोय हे जाणवलं.

"मग पुढे काय झालं बाबा? problem solve झाला त्यांचा?"
"लगेच नाही, पण तो solve करायला बळ मिळालं."

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...