Skip to main content

प्रेम नक्की कशावर करायचं आहे?

A click by: Varun Bhagwat


"प्रेम आणि settlement यामधील एक गोष्ट choose करायची ही वेळ आहे रोहिणी."
"मला देवेशची position आणि त्यामुळे येणारी power choose करायला आवडेल नैना.."
"प्रश्न तो नाहीये रोहिणी."
"मग?
"Power दिसणं आणि मिळणं आणि मिळाली तर ती वापरणं यात फरक आहे."
"काय बोलते आहेस?"
"तुला देवेशची business मधली position आत्ता खूप fascinating वाटते आहे आणि आदित्य हे तुझं प्रेम आहे."
"Kind of!"
"लग्नाच्या उंबरठ्यावर kind of वगैरे उत्तरं नकोयत मला."
"बरं हो. असंच आहे."
"You need to choose what is right and not what is convenient, कळतंय का?"
"पण मी convenience च choose करणार ना? Settlement is more important ना?"
"हे तुला दिसतंय. पण ही power तुझी नाहीये. ती देवेशची आहे हे पण लक्षात घे. हे बघ कुठलं goodwill किंवा जुने उपकार वगैरे यातून हा लग्नाचा घाट घातला जातो आहे."
"Family चा पण आहे तसा connect."
"हो पण तुझा आणि देवेशचा आहे का connect? आणि माणूस म्हणून तुला सुद्धा तो माहितीये कसा आहे. तू भरडली जाशील यात त्या बिचाऱ्या उंदरासारखी."
"काय?"
"तुला ती उंदराची गोष्ट माहितीये ना ज्यात त्याने जाळ्यात अडकलेल्या सिंहाला सोडवलं."
"Yes. यातून आपण हेच शिकलो की कोणाला कमी लेखायचं नाही."
"हो मान्य. पण पुढे काय झालं माहिती आहे का?"
"काय?"
"सिंह म्हणाला हवं ते मागून घे. उंदराने काय मागावं?"
"काय?"
"त्याने सिंहाच्या मुलीसोबत स्वतःचं लग्न लावून देण्याची मागणी केली."
"सिंहाने होकार दिला?"
"Unfortunately yes."
"चांगलंय ना. यात unfortunate काय आहे?"
"पूर्ण ऐक. सिंहाने त्याच्या मुलीला म्हणजेच सिंहिणीला गुहेतून बाहेर बोलावलं. ती तिच्याच तालात चालत आली आणि तिला दिसलं पण नाही, तिने तिच्या पायाखाली उंदराला चिरडलं. तुला असं करून घ्यायचं आहे का?"
"माझं असं होणारे का?"
"शब्दशः नाही. पण if it’s a business deal, तर लग्न होईल, प्रेम नसेल. कदाचित तू दुर्लक्षित पण राहशील. हे बघ निर्णय सर्वस्वी तुझा आहे. तू decide कर. आत्ता जे छान वाटतं ते long term मध्ये घातक ठरू शकतं. एरवी जर आदित्य तुझ्या आयुष्यात नसताच तर हा प्रश्न नव्हता. पण इतकं प्रेम करणारं कोणी असताना तुला आता निश्चितच ठरवायचं आहे की तुला नक्की काय पाहिजे? प्राधान्यक्रम तू ठरव. Power तुला दिसतीये. पण ती तुझी नाही, त्याची आहे. तुझं यात कुठे स्वतंत्र अस्तित्त्व राहणार नसेल तर तुलाच नंतर कसं वाटेल हे ही तूच ठरव. प्रेम नक्की व्यक्तीवर करायचं आहे की भौतिक गोष्टींवर हे ही तू ठरव. कारण तुझी नैय्या पार करण्याची ताकद आदित्यमध्ये नक्की आहे. बाकी all the best! एक मैत्रीण म्हणून यापलीकडे मी काय बोलू?"

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...