Skip to main content

शांतपणा...

 

A Click by: Sushil Ladkat

माणसाला दिवसभर थकल्यानंतर गरज  असते शांततेची. अनेकदा ही हवी असणारी शांतता त्याच्या नशिबी असतेच असं नाही. कधी कधी थोडीशी संधी मिळते पण नेमकं काही ना काहीतरी घडतं आणि शांतता भंग पावते. मात्र ही हवी असणारी शांतता नक्की शोधावी. प्रत्येकाने शोधावी. अनेकांना त्याची गरज जाणवत नाही पण ती गरजेची असते हे ती अनुभवल्यावर कळतं.

या शांततेतून मिळतं तरी काय? मिळतो तो स्वतःसाठी गरजेचा असणारा पण आजकालच्या धकाधकीत माणूस स्वतःलाच न देऊ शकणारा वेळ.  रोजची चाललेली धावपळ कशासाठी हे पुनःश्च एकदा चाचपून पाहण्याची संधी ही शांतता देते. शांतता आपल्याला आपल्या passion कडे नेते. रोजमर्रा च्या आपल्या आयुष्यात आपण अनेकदा आपली passion च विसरून जातो. या शांततेत एक chance असतो त्या passion ला शोधण्याचा. ज्यांनी शोधली आहे त्यांना ती जगण्याचा.

बाकी सगळं राहू दे बाजूला. ही शांतता किमान आपल्या थकल्या जीवाला थोडी शांती देऊन नव्या दिवसासाठी ताजतवानं तरी करते.  हिला कमी लेखता कामा नये. ही आपल्याला थोडसं busy जगातून unbusy व्हायला शिकवते. Unbusy व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? आता उत्तर असं पण आहे की प्रत्येक वेळी काही केलंच पाहिजे का? काही न करणं सुद्धा जमलं पाहिजे. म्हणजे काय लगेच आपण निष्क्रिय झालो असं होत नाही. असा guilty भाव अनेकांमध्ये येण्याची शक्यता असते. पण असं मुळीच नसतं.

स्वतःला पुन्हा ऊर्जा मिळवून देण्यासाठी थोडसं switch off होणं गरजेचं असतं. कितीतरी वेळा आपण आपली electronic devices hang होऊ लागली की त्यांना switch off आणि switch on करतो. बरं आपण तर machine पण नाही. हाडामासाची माणसं आहोत. मग या शरीराला आणि मनाला इतकं थकवल्यावर थोडं थांबावं. नाहीतर वेगाने धावणाऱ्या दुनियेत थकून आपलाच speed कमी व्हायचा....  धावायचं आहे. पण थोडं थांबून...

आपल्या आयुष्यातील शांततेच्या महत्त्वाला कमी लेखून चालणार नाही. Chaos आपल्याला काही सुचू देत नाही.

नवं काही सुचू द्यायचं असेल तर शांतता हवी.

नव्याने स्वतःला पाहायचं असेल तरी शांतता हवी.

जोरात धावायचं असले तरी क्षणभर विश्रांती हवी.

जीवाला घटकाभर शांती हवी.

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...