Skip to main content

Posts

Showing posts from 2022

Romantic Headphones

  Wired headphones म्हटलं की त्याचा गुंता आलाच. हाच गुंता सोडवायचा प्रयत्न करत राहुल घरच्या bed वर निवांत पडला. तेवढ्यात तिथे राहुलचा मित्र संकेत आला. त्याने राहुलचा, गुंता न निघालेला headphone बाजूला ठेवला. खिशातून स्वत:चे airdopes काढले. एक त्याला दिला. दुसरा त्याने स्वतःच्या कानात घातला. Airdopes हे Bluetooth ने connect होत असल्याने थोड्या अंतरावर खुर्चीत जाऊन तो बसला. दोघे गाणी ऐकू लागले. राहुल एकदम जुन्या आठवणींत रमला.  बाजूला ठेवलेले गुंत्यात असणारे headphones त्याला दिसले. त्याने ते अलगद स्वतःकडे घेतले. गुंता सोडवत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. . . Train चा आवाज आधी मोठा होता. जशी train रुळावर रुळली तसा आवाज कानांना normal & used to झाला. राहुल आणि तानियाने एकच wired headphone share केला. Local train मध्ये दोघे एकमेकांसमोर बसले. लोणावळा ते पुणे असा परतीचा प्रवास, बाहेर पावसाचं वातावरण, धुकं जमलेलं, दोघे बऱ्यापैकी चिंब भिजलेले. अर्थात अशा trips ठरवूनच चिंब भिजण्यासाठी केल्या जातात. तशीच ही trip. सोबत group होता. पण आता सगळ्यांची trip enjoy करून झाली होती नि प्...

असं का?

  तुझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं की कुठलीतरी खोलवर वेदना का दिसते गं? तू कशी आहेस विचारल्यावर हसतेस नि म्हणतेस बरी आहे. त्या हसण्यात तू बरी नाहीयेस, हे का कळतं गं मला? तुझ्या विचारात तू हरवतेस नि मग तुझ्या नजरेत पोकळी का असते? आपण एकमेकांच्या मिठीत नेहमी विसावत नाही, तरी आपली मिठी तुला का हवीहवीशी वाटते? आणि मग आपण मिठीत काही क्षण जास्तच का बरं विसावतो? मिठीचे ते जास्तीचे क्षणच समाधान का देतात? आपण मिठीतून नेहमी अलगद का बाहेर येतो? उबदार मिठी सुटली तरीही तो उबदार स्पर्श हवाहवासा का वाटतो? मिठी सुटताच सहज हातात हात का गुंफला जातो? एकमेकांची सोबत त्या हाताच्या स्पर्शाइतकी उबदार का वाटते गं? आपण एकमेकांच्या कुशीत किंचित जास्त वेळ का रमून जातो गं? आपलं नातं जन्मोजन्मीचं आहे असं का बरं वाटतं? आपण एकमेकांसवे नसतो तेव्हा आठवणींत एकमेकांसवे का बरं असतो? मग भेटल्यावर आपण एकमेकांची किती आठवण काढली होती हे का सांगतो? लिहिता लिहिता तो थांबला. त्याने तिला विचारलं, "असं का गं?" ती पुस्तक वाचत होती. पुस्तकातून डोकं बाहेर काढत म्हणाली, "काय माहित?" नि ती पुन्हा पुस्तक ...

शब्द (कोणता नि कसा?)

शब्द बोलला. बोलून गेला. मग जाणवलं, चुकला.  का बोलला? उगाच बोलला.  खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.  शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते.  कधी कधी ठरवून वार होतो, कधी चुकून वार होतो. कधी कठोर शब्द वापरावे लागतात. कधी नकळत वापरले जातात.  याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात. शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं. हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो.  शब्द नकळत घाव घालतात. हेच शब्द घाव भरून काढतात.  शब्द ओले, शब्द कोरडे. शब्द शहाणे, शब्द वेडे. शब्द जोडले तर वाक्य. वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद. संवाद एकतर बरा किंवा वाईट. संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो. शब्दाची ताकद मोठी असते. ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते.  शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात. अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमि...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...

तू चल... मी आहेच!

  मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!" मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार! मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी  हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो. मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये? एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधार...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

मिटता काजळी, दीप उजळी!

  A click by : Varun Bhagwat  मशाल जळत होती. त्यातून निर्माण होणारी आग केसरी, गडद पिवळा रंग झळकवत होती. त्या आगीतून तयार होणारी आभा त्याच्या मुखावर पसरली. मुखावर तेज दिसू लागलं. आजूबाजूला मिट्ट काळोख. केवळ चेहऱ्यावर आगीची आभा, त्यामुळे येणारं तेज, आणि शांत उभा असलेला तो!  अंधारात असणाऱ्या कोणासाठीही एक प्रोत्साहन होतं ते चित्र! इतका मिट्ट काळोख आयुष्यात निर्माण झाला तरी इवलासा प्रकाश तमाचा अंत करू शकतो. "पिछे मेरे अंधेरा, आगे आँधी आँधी हैं, मैंने ऐसी आँधी में दिया जलाया है|" या गुलजार जींच्या ओळी तंतोतंत तिथे बसल्या. ते चित्र प्रेरणा देत होतं की कितीही नकारात्मकता असली तरी एक छोटी ज्योत सारं काही उजळून टाकते. आग ही खरंतर विध्वंस करणारी गोष्ट देखील आहे. परंतु हाच अग्नी पंच महाभूतांपैकी एक आहे. It's a source of energy. तिमिरातून तेजाकडे जाताना हा अग्नी मदत करेल. मनात हा अग्नी सतत प्रदीप्त असायला हवा. तोच ऊर्जा देतो. मशाल तर खूप जास्त प्रकाश देते. पण एक छोटी पणती सुद्धा तिचा परिसर समृद्ध करते. आपण आपल्या परीने पणती होऊ शकतो, मशाल होऊ शकतो. इतक्याशा प्रकाशाने काय होणार?...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...

तिची आठवण!

A click by: Varun Bhagwat  सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको. पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट. पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं. हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' कर...

स्वीकार केला की सोपं होतं!

  A click by: Varun Bhagwat  तो थकून आडवा पडला होता. छताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नाही अशी एक भावना निर्माण झाली. नीट पाहिलं तर अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतातच. हे प्रत्येकाच्या बाबतीत, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात लागू होतं. साऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि असं होऊ शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. ज्यांना आपलं मानलं ते जर आपापलंच पाहू लागले तर? ही भावना खरंतर त्रासदायक आहे. पण प्रत्येक जण आपापलं पाहणारच. यात गैर काही नाही. हा स्वीकार केला की सोपं होतं. कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये. ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवा तसाच वागतो. ह्याचा एकदा स्वीकार असला की मग सोपं होतं. Routine हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं. नेहमीच दुसरं कोणी आपलं मनोरंजन करेल असं नाही. किंबहुना आपलं आपल्यालाच आपला 'दोस्त' होत self entertain करावं लागतं. हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमू शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही. उलट आपले निर्णय आपणच घ्यावे. बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपलीच असेल याचा स्...

पांडुरंग आणि Google maps

A click by: Varun Bhagwat  कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही अंतिमतः पोहोचण्याचं ठिकाण अर्थात final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय. Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक मात्र तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. मात्र प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं. रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का. कधी चढ तर कधी उतार. कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता. कधी सरळ तर क...

अर्धविराम ;

  A click by : Varun Bhagwat किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं. आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत  नव्हती आपली एकमेकांना? खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं. अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो. पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची! एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली. तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास. माझ्या हास्यात हसू शोधलंस. तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले. माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस. सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो. किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं. तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं.  आपल्या एकत्र असण्यात जान होती. निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती. पण हे सारं फार लवकर संपलं. खूप काही करायचं राहून गेलं. खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्ह...