Skip to main content

अडचण आणि gaps


 

A Click by: Varun Bhagwat


शाळेमध्ये आज सर मुलांशी अनौपचारिक गप्पा मारत होते.

सर म्हणाले, “कल्पना करा, तुम्ही रस्त्यातून चालत जाताय... रस्त्यामध्ये मोठ्ठा दगड ठेऊन दिला आहे. तुमचं लक्ष कुठे जाईल?”

एक मुलगा खोडीलपणे म्हणाला, “दगड ठेवणाऱ्या माणसाला शोध घेण्याकडे लक्ष जाईल.”

सर हसले आणि बोलले, “छान. पण गंमत सोडा. काय दिसेल सांगा पाहू?”

मुलं म्हणाली, “दगड.”

 

“आज अमितच्या शर्टवर डाग पडला होता. मुलांनो त्याच्याकडे पाहताच तुमचं लक्ष कुठे गेलं?”

“सर, डागाकडे.”

 

“उदाहरणं, प्रसंग अनेक आहेत. सगळी गंमत इकडेच आहे. म्हटलं तर दगडापेक्षा रस्ता मोठा आहे. रस्ता दिसायला हवा. पण दिसतो दगड. इतका सुंदर शर्ट अंगावरती आहे, डागापेक्षा शर्ट मोठा आहे. पण लक्ष डागाकडे जातं.”

“सर असा दगड दिसला की काढला पाहिजे ना..”

“बरोबर... दगड म्हणजे अडचण. आपण ती दूर करावी. स्वत:ला आणि लोकांनाही फायदा होतो.”

तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, “पण सर कधीकधी तो दगड उचलणं अशक्य असतं... अर्थात खूप मोठी अडचण असते जी स्वत: तिथून हलायला तयार नसते. आपण तिथे काहीच करू शकत नसतो. मग करायचं....???”

सर म्हणाले, “अरे वा... तुम्ही मुलं इतका छान विचार करू लागलायत हे माझ्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे. हां, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की मग अडचण हलणार नसेल तर gap काढता आली पाहिजे.”

“म्हणजे?”

“मुलांनो, तुम्हाला Ricky Ponting माहित आहे?”

“Australia चा माजी कर्णधार.”

“Yes. जरी तो भारत देशाचा नसला तरी त्याच्या खेळातून आणि विचारातून शिकण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.”

“ती कोणती सर?”

“फार कमी खेळाडू test cricket मध्ये १३००० धावांचा टप्पा गाठू शकले. त्यामधला एक म्हणजे Ponting. या यशामागचं रहस्य विचारताच तो जे म्हणाला ते विचार करायला लावणारं आहे.”

“काय म्हणाला सर तो?”

“त्याला विचारलं गेलं की इतक्या धावा कशा करू शकलास बाबा? तर तो म्हणाला की शक्यतो सगळे जण batting करताना एकदा fielding कशी लावली आहे ते बघून ठेवतात. पण असं केल्याने अडचण अशी होते की डोक्यात fielders कुठे आहेत हे fit होतं. पण मी मात्र gaps बघून ठेवतो. माझ्या डोक्यात मैदानावर चेंडू अडवणारे ११ जण येत नाहीत. तर त्याहून अधिक gaps मला दिसतात.”

“सर भारीच आहे हे.”

“नुसतं भारी म्हणून चालायचं नाही. आपण एखाद्या अडचणीकडे कसं बघतो हे महत्त्वाचं. पुन्हा Ricky च्या भाषेत बोलायचं तर तो अडचण बघत नाही संधी बघतो. Gaps शोधता आल्या पाहिजेत. कितीही fielders चं जाळं लावलं तरी आपल्या देशाच्या सौरव गांगुलीला सुद्धा off side मधून gap काढायला कधीच अडचण आली नाही. याला म्हणायचं अडचणीमधून संधी शोधत राहणं. मग चेंडू बरोबर boundary पार करतो.”

 

-       वरुण भागवत

Comments

  1. अप्रतिम उदाहरण आणि येणाऱ्या अडचणीला/संकटाला कसं सामोरं जायचं हे व्यवस्थित मांडलंय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...