वेद आणि सिद या २ मित्रांचा संवाद चालू होता. “आज father’s day आहे म्हणे.” “हां... ते days चे प्रकार वर्षभर चालूच असतात.” “ते खरंय.” “कशाला लागतात रे हे days?” “कदाचित व्यक्त व्हायला.” “बाकी जाऊ दे, पण तू वडिलांवर कितीही व्यक्त हो, त्यांना त्यांच्या लेकापेक्षा लेकीच प्रिय.” “हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीये.” “अरे, पण जास्त करून असंच असतं की नाही? “हो, पण त्यात बापाची चूक नाही. तो मुलीबाबत जास्त हळवा असतो इतकंच.” “इतका हळवा की मला अगदी हिडीस-फिडीस करावं का?” “सिद, chill. काय भांडला आहेस का वडिलांसोबत?” “तसं नाही यार वेद, मुलाचं वडिलांसोबत नातं सोपं नसतं नाही?” “नाही. नसतं. हे मला मान्य आहे. “मी तर म्हणेन ते थोडं अर्धवट असतं.” “अर्धवट?” “हां... बाकी काही असो... पण त्या निमित्ताने म्हण किंवा काय, मी वडिलांवर थोडसं लिहिलंय वेद..” “तू लिहिलंयस?” “हो.” “मगाशी तर म्हणत होतास मला days चं काही कौतुक नाही आणि तू तर लिहिलंयस...” “आता बोलू की नको?” “आता काय बोलतोस?” “अरे म्हणजे ऐकवू की नको?” “काय ऐकवतोस?” “माझी थट्टा करणार असशील तर नंतर बोलू.” ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...