Skip to main content

चोर


A click by: Varun Bhagwat


“त्याने स्वत: इथे या company मध्ये काम केलं. त्याला आपण सगळं दिलं यार...”

“झालं काय?”

“आपण जे मार्केट मध्ये नवीन product launch करणार होतो त्याची तारीख पण आपण पक्की केली होती.”

“Yes. Right.”

“त्याचं presentation त्याने केलं आणि पूर्ण credit लाटलं.”

“How come?”

“Product बनवायचा formula ज्या core team ला माहित होता, त्या core team मधला हा एक member.”

“हो बरोबर.”

“आपल्या launch ची date ठरली आणि strategically he resigned. He joined our rival firm. त्याने असंच्या असं product बनवलं फक्त थोडेसे बदल करून... आणि presentation दिलं and now त्यांचं launching almost ready आहे. त्यांनी advertise पण दिली.”

“आपलं पण product आहे ना?”

“हो पण launch कुठे झालंय. Ad कुठे आहे? दिसताना असं दिसणार की आपण यांचं product चोरलं. कारण आपली अजून advertise नाही. म्हणजे त्यांनी आधी ad केल्यामुळे लोकांच्या दृष्टीने ते त्यांचं product होणार. थोडा formula change करून त्याने तिकडे बनवल्याने बाकी patent चा पण विषय नाही.”

“आपण launch का नाही केलं पण आधी?”

“तो project थोडा back burner वर गेला आणि... ते थोडं मागे पडलं..”

“आणि त्याने फायदा घेतला.”

“So unprofessional.”

“ज्याच्या हाती ससा त्याचाच ठसा.”

“काय?”

“आपण गोष्टी वाचल्या पण बोध नाही घेतला.”

“नीट सांग काय म्हणायचं आहे तुला ते.”

“अरे, एक राजा होता. त्याने फर्मान काढलं की जो त्याच्यासाठी सश्याची शिकार करेल आणि त्याला आणून देईल त्याला बक्षीस. सगळे कामाला लागले. रामूने शिकारीत यश मिळवलं. तो जंगलातून मोठ्या खुशीत  शिकार घेऊन येऊ लागला. त्याला वाटलं आपणच पहिली शिकार करण्यात यशस्वी झालोय. लवकरच राजाला खुश करूया. तो भराभर पावलं टाकू लागला. तेवढ्यात बाळूने त्याला गाठलं. त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यात धूळ फेकली. पटकन रामूने मारलेला ससा हिसकावून घेतला. बाळू दरबाराच्या दिशेने पळू लागला. रामू भानावर येईपर्यंत हा बाळू दरबारात पोचला सुद्धा. रामू डोळे चोळत दरबारात पोचला. तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झाला होता.”

“पण, रामूची बाजू सत्याची होती. तो काही बोलला नाही?”

“सत्य काय आहे...?  जे समोर दिसतं या पेक्षाही जे दाखवलं जातं. बाळूच्या हातात ससा दिसत असताना रामू तिथे काही बोलला असता तरी उलट त्यालाच शिक्षा झाली असती.”

“म्हणजे कौशल्य वापरणाऱ्यापेक्षा डावपेच करणारे सरस ठरणार तर?”

“दुनियादारी मित्रा.”

“आपल्यासारख्याने काय करायचं?”

“आपण पण असं वाईट वागायचं?”

“आपली तशी नियत नाही.”

“असं करताना त्यांना काही वाटत नाही.”

“हा वाद घालण्यात काहीच point नाही.”

“मग?”

“अनुभवाने तरी शहाणं व्हायचं. वेळच्या वेळी अशा लोकांना ओळखायचं... या पेक्षा सुद्धा कोणाला किती काय सांगायचं आणि दाखवायचं ते आपण ठरवायचं. थेट results दिसले आणि एकदा गोष्ट बाजारात आली की मग formula open केला तरी आपल्याला फार फरक पडत नाही. पण एरवी...”

“एरवी काय?”

“एरवी काय.... जरा जपून...”

“खरं आहे...”

“असू दे. तू नको नाराज होऊस. एकदा चोरतील आणि भोगतील सुद्धा... पण तुझ्यात कौशल्याची कमी आहे का? आपण करत राहू.”

 

-       वरुण भागवत

           

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...