| A click by: Varun Bhagwat |
भाऊ आणि नाना लहानपणापासूनचे मित्र. आज २०
वर्षांनी त्यांची गाठ पडली. दोघे साठीच्या उंबरठ्यावर होते. इकडच्या तिकडच्या
गप्पा झाल्यावर त्यांच्या गप्पांनी थोडं वेगळं वळण घेतलं. नाना बोलता बोलता
म्हणाले,
“अरे त्या आपल्या अप्पाचा काही contact नाही.”
“नाही तेच बरंय.” भाऊ बोलून गेले.
“असं
का बरं?” नानांनी विचारलं.
“अप्पाचं वाईट वाटतं. पण काय करणार?” भाऊ
म्हणाले.
“मला नीट सांगशील?”
भाऊ सांगू लागले, “नाना, त्या अप्पाच्या पोरांमध्ये काय जमीन- अस्मानाचा फरक आहे. त्याची पोरं संजू आणि विजू. सख्खे भाऊ. पण संजू इतका गुणी आणि
विजू मात्र गुन्हेगारी मार्गाला लागला.”
“होय?”
“हो
ना. तसा माझा पण contact नव्हता.
पण इतक्यात समजलं. नाना, हे असं घडू शकतं? दोन सख्खे भाऊ आणि इतका फरक?”
“घडू शकतं भाऊ.”
“कसं?”
“जसं दोन पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं
संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं.”
“पोपट कुठून आले नाना?”
“अरे तुला ती पोपटाची गोष्ट आठवते का?”
“कोणती रे?”
“एका पोपट विकणाऱ्या माणसाने एका शेठजीला दोन
पोपट विकले. एकाची किंमत ५ रुपये आणि दुसऱ्याची १०० रुपये. शेठजीला किमतीतला फरक
पाहून धक्काच बसला. पण पोपट विकणारा मनुष्य म्हणाला, “विश्वास ठेवा. मी उगाच नाही
विकत आहे असं.” शेठजीने पैशाचा फार विचार न करता दोन्ही पोपट विकत घेतले. १००
रुपयाचा पोपट त्याने स्वतःच्या खोलीत ठेवला. ५ रुपयाचा पोपट त्याने hall मध्ये
ठेवला. शेठजी झोपून गेला. दुसऱ्या दिवशीची शेठ्जीची सकाळ त्या खोलीतल्या पोपटाच्या
गाण्याने झाली. त्याने छानपैकी शेठजीचं मनोरंजन केलं. शेठजी hall मध्ये ५ रुपयाच्या
पोपटापाशी आला. तो पोपट काहीच बोलेना. शेठ्जीला वाटलं हा काही बोलत नाही म्हणून
याची किंमत कमी असावी. शेठ्जीने दोघांना खायला पेरू आणि मिरची दिली. १०० रुपयाच्या
पोपटाने आवडीने ते खाल्लं. मिरची थोडी तिखट लागली हे ही त्याने स्पष्ट सांगितलं. ५
रुपयाच्या पोपटाने ते खाल्लं आणि तिखट लागताच तो अतीशय घाणेरड्या शिव्या घालू
लागला. शेठजीला आता मात्र त्याचे खरे रंग आणि किंमत कळली.”
“नाना पण संजू-विजू सख्खे भाऊ.”
“ऐक रे. गोष्ट संपली नाहीये. काही दिवसांनी
शेठजीची पोपट विकणाऱ्या माणसाशी गाठ पडली. तो म्हणाला, शेठजी कळलं त्यांच्या
किमतीत इतका फरक का ते?” यावर शेठजी म्हणाले, “पण असं कसं?” पोपट विकणारा हसून
सांगू लागला, “खरंतर हे दोन पोपट सख्खे भाऊ. पण यातला एक जण या आधी अशा माणसाकडे
होता जो सज्जन होता. उत्तम बोलायचा, छान गायचा. त्याची संगत याला लाभली; पण दुसरा
मात्र अशा ठिकाणी होता जो घरच्या व्यक्तींनाच शिव्या द्यायचा. वाईट वागायचा. म्हणून
हे असे झाले.”
“संगतीचा इतका परिणाम नाना?” भाऊ विचारत
होते.
“हं... म्हणून तुला मगाशी म्हणालो, जसं दोन
पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं... फक्त
संगतीमुळे.”
- वरुण भागवत
As usual khup sundar lihilai 🥁
ReplyDeletewho said this
ReplyDelete1. Give me a child I will make his anything!
2.It is not heredity or environment but heredity and environment influence human development !
आपण चांगल्या लोकांचीच संगत धरुया.छान गोष्ट वरूण.
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteसुसंगती सदा घडो
ReplyDeleteSangat uttam jamaliye....
ReplyDelete👌👌