| A Click by: Varun Bhagwat |
आज अविनाशने त्याच्या boss चा चांगलाच ओरडा
खाल्ला होता. वैतागून तो break-out area मध्ये थोडा relax व्हायला आला. तिथे
त्याच्याच department मधली संजना पण होती.
त्याला वैतागलेलं पाहून संजना म्हणाली, “अवि,
are you okay?”
“No. I’m not.”
“काय झालं? Boss चिडले?”
“मग काय... संजना, मी काय म्हणतो, अशी काही
permanent किंवा ठराविक पद्धत आहे का boss शी बोलण्याची?”
“ठराविक पद्धत म्हणजे?”
“म्हणजे असं केल्याने win-win situation
असेल... तो ही खुश; आपण पण खुश.”
“अवघड आहे. अशी कोणतीच ठराविक पद्धत नाही. तू
कसा पण वाग. कधी boss बोलेल तर कधी बाकीच्या व्यक्ती तुला बोलतील.”
“हे कसलं उत्तर झालं यार...?”
“अरे अनुभवावरून सांगतेय बाबा.”
“कोणताच boss नीट नसेल का?”
“अरे मी असं कुठे म्हणाले? हे बघ सगळे boss काही वाईट नसतात. पण मी म्हणाले, तू
boss शी कसाही वाग, बोल... कधी boss सुनावेल तर कधी बाकी कोणीतरी बोलेल, त्यांचा संबंध नसला तरी...”
“प्च...”
“अरे, तुला त्या बिचाऱ्या नोकराची गोष्ट
माहितीये. वो रट ले. यहां पे बहुत काम आएगी.”
“कोणती गोष्ट?”
“आपण कसे नोकरदार आहोत तसाच एक नोकर एका
शेठजी कडे कामाला होता. एक दिवस शेठजीला रात्री फेरफटका मारायची लहर आली. तेव्हा
दिव्याची सोय नव्हती. म्हणून नोकराला त्याने कंदील धरायला सांगितलं आणि चल
म्हणाला. नोकर निमूटपणे शेठजी च्या पुढे चालू लागला, पुढचा रस्ता आणि उजेड दिसावा म्हणून... तिथून चालणारी एक व्यक्ती
शेठजीचं लक्ष नाही असं पाहून नोकराला म्हणाली, “काय उद्धट वागणं आहे रे तुझं. सरळ
सरळ शेठजीच्या पुढे चालतोस... नोकराने त्याची चालायची गती कमी केली आणि आता
शेठजीसोबत चालू लागला. तिथून जाणारा अजून एक जण शेठजी आपल्याकडे बघत नाही ना याची
खात्री करून घेत नोकराला म्हणाला, “काय तुझं वागणं, शेठजीच्या सोबत चालून
त्यांच्याशी बरोबरी करू पाहतोयस?” नोकराने गती अजून कमी केली आणि शेठजीच्या मागून
चालू लागला. अगदी थोडा वेळ गेला. आता बाकी कोण काही बोललं नाही. पण शेठजी म्हणाला,
“असा मागून चालल्यावर मी अर्धवट प्रकाशात चालायचं का?” संजना बोलता बोलता थांबली.
“मग नोकराने काय केलं?” अविनाशने उत्सुकतेने
विचारलं.
“माहित नाही.”
“अगं, अर्धवट गोष्ट काय सांगतेस?”
“मी अर्धवट गोष्ट सांगत नाहीये. गोष्ट इथे
संपते.”
“म्हणजे यावर solution नाही?”
“Fix असं काही solution नाही.”
“मग काय?”
“You know, they say... you need to be
flexible...”
“याला काहीच अर्थ नाही.”
“Chill... फार मनाला लावून नको घेऊस. असं आहे
ना की, जो तो ज्याच्या- त्याच्या चष्म्यातून पाहतो. तू तुझा चष्मा छान carry
करायला शिक. चलो, break खतम, काम शुरू.”
- वरुण भागवत
Sahi hai
ReplyDeleteSahi re.. perfect
ReplyDeleteYes's... Perfect... 🙋👍👍
ReplyDeleteBoss is always Right!
👌👌👌
Thank you all
ReplyDelete