A click by: Varun Bhagwat कातरवेळ. सूर्य उदास आहे असं वाटत होतं. Bike वर जाणारा मी मित्रासोबत होतो. Highway वर चहाची टपरी दिसली. नकळत गाडी बाजूला घेतली. तिथेच एक बाकडं दिसलं. बसलो. २ कटिंग सांगितले. मित्राने सहज गाणं लावलं. पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी लिहून संगीत दिलेलं गाणं. शब्द ऐकले. "तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट!" या पहिल्याच ओळीने गाण्यात बुडून गेलो. तिथून खूप खूप दूर असणाऱ्या माझ्या तिच्यापर्यंत पोहोचलो. दूर असून खरंतर कसा तिच्यापर्यंत पोहोचलो? हो, शरीराने दूर होती, पण गाणं तिच्या जवळ नेत होतं. खरंतर नाही, बहुधा जवळ आणून तिच्यापासून पुन्हा दूर करत होतं. कारण लगोलग भेट होणं शक्य नव्हतं. वाटलं, माझ्या एका हाकेसाठी वाट पाहतेय का ती?? स्वतःला प्रश्न केला, मी हाक मारत नव्हतो का? जाणवलं की ती किती वाट पाहत असेल. कामानिमित्त कित्येक दिवस तिच्या भेटीविना जातात. तिची आठवण तर रोज होते. हाक मारायचं राहून जातं. ती वाट पाहत असेल. आलो नाही हे पाहून अश्रू गालावर ओघळू देत असेल. खिडकीतून तिला चंद्र दिसतो, तो निरखत असेल. चंद्र कळा बदलतो. कधी वाढत जात...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...