Skip to main content

Posts

स्वीकार केला की सोपं होतं!

  A click by: Varun Bhagwat  तो थकून आडवा पडला होता. छताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नाही अशी एक भावना निर्माण झाली. नीट पाहिलं तर अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतातच. हे प्रत्येकाच्या बाबतीत, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात लागू होतं. साऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि असं होऊ शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. ज्यांना आपलं मानलं ते जर आपापलंच पाहू लागले तर? ही भावना खरंतर त्रासदायक आहे. पण प्रत्येक जण आपापलं पाहणारच. यात गैर काही नाही. हा स्वीकार केला की सोपं होतं. कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये. ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवा तसाच वागतो. ह्याचा एकदा स्वीकार असला की मग सोपं होतं. Routine हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं. नेहमीच दुसरं कोणी आपलं मनोरंजन करेल असं नाही. किंबहुना आपलं आपल्यालाच आपला 'दोस्त' होत self entertain करावं लागतं. हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमू शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही. उलट आपले निर्णय आपणच घ्यावे. बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपलीच असेल याचा स्...

पांडुरंग आणि Google maps

A click by: Varun Bhagwat  कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही अंतिमतः पोहोचण्याचं ठिकाण अर्थात final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय. Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक मात्र तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. मात्र प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं. रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का. कधी चढ तर कधी उतार. कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता. कधी सरळ तर क...

अर्धविराम ;

  A click by : Varun Bhagwat किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं. आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत  नव्हती आपली एकमेकांना? खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं. अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो. पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची! एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली. तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास. माझ्या हास्यात हसू शोधलंस. तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले. माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस. सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो. किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं. तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं.  आपल्या एकत्र असण्यात जान होती. निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती. पण हे सारं फार लवकर संपलं. खूप काही करायचं राहून गेलं. खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्ह...

स्वयंप्रकाशी तारा...

  A click by : Varun Bhagwat सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो? त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे. मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का? किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का? त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का? सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.) विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धा...

सुट्टी

A click by- Varun Bhagwat (pic name- Ray of hope) निशिकांत सकाळीच थोडासा पडलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघाला. नीट हाय, हॅलो, बाय, असं काहीच त्याच्या पत्नीशी न करता त्याचा दिवस सुरू झाला. कामावर पोचला, मन लागेना. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं. तसं ह्याचं मन घरीच राहिलं होतं. ते सगळं बॅड मूड वालं बॅगेज घेऊन तो कामावर आला होता. काम धड होईना, तिची आठवण होऊन उपयोग पण होईना. त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ तारीख होती. घड्याळात ९.०० वाजले होते. बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं. "येऊ?" निशिकांतने दरवाजा हलकेच ढकलत विचारलं. नुसतं फाईल कडे बघत हातानेच "कम इन" असं न म्हणता बॉस छान हसला, म्हणाला, "या, आत या. बसा." निशिकांत खुर्ची मागे सारत सरांसमोर बसला. "ऑल वेल?" बॉसचा प्रश्न. "हां." निशिकांतचं उत्तर. "वाटत नाही....

आठवणी- हवेहवेसे त्रास

  A click by: Varun Bhagwat "आठवणी." "त्यांचं काय?" "या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये." "का लावून घेऊ नये?" "त्रास देतात या आठवणी." "अगं, याच आठवणी जगवतात. याच आठवणी जगण्यात मजा आणतात. याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात. आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात." "हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते." "हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपा...

जे नकोय ते बाजूला कर!

A click by: Varun Bhagwat "सुचत नाहीये." "काय?" "काहीच नाही." "असं का?" "माहीत नाही." "मला माहितीये." "मनकवडा आहेस का?" "हाहा..." "हसू नको. उत्तर दे." "सुचत नाहीये म्हणजे छान किंवा नवं काही सुचत नाहीये. बरोबर?" "हो." "कारण तुझं मन बाकी विचारांनी preoccupy झालंय." "As in?" "आधीच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, पण बदलणं तुझ्या हातात नाही त्या विचारांनी अस्वस्थ झालायस. किंवा इतरही demotivating thoughts मनात घोळतायत." "हं. पण मग करू तरी काय?" "सोड." "असं कसं सोड?" "तू ज्याचा विचार करत आहेस ते केवळ विचार करून बदलेल?" "नाही." "तू नुसताच गप्प बसून राहिला आहेस का?" "नाही. मी try केला काही प्रमाणात जे पटत नाही ते बदलण्याचा. थोडा demotivate झालो तर स्वतःला push करण्याचा." "आणि?" "थोडं बदललं." "Good." "Good काय? बाकीचं..." "सगळ...