"कोरा कागद घेऊन बसलो आणि ठरवलं की आता काहीतरी लिहावं." "मग?" "सुचत नाहीये." "असं का?" "माहीत नाही. खरंतर सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. पेन, पेपर, टेबल, शांत जागा." "इतकं पुरतं की अजून काही लागतं?" "लागतं." "काय?" "लिहिण्याची भूक आणि कागदावर काहीतरी छान उमटवण्याची मनापासून इच्छा!" "मग ती नाहीये का तुझी?" "ती पण आहे?" "मग आज कागदावर काही उमटत नाही असं सुरुवातीलाच का म्हणालास?" "कारण खरंच उमटत नाहीये." "म्हणजे भूक आणि इच्छा कमी पडली का?" "काहीतरी पडतं कमी. पण ते कमी पडतं हे पण मान्य करता यायला हवं" "म्हणजे?" "म्हणजे भूक आणि इच्छा याही पलीकडे मला आज लिहिता येत नाहीये, सुचत नाहीये हे मी सांगतोय." "तुला येत नाहीये हे कशाला सांगतोय?" "म्हणजे?" "तू ते लपवू शकतो. लिहायला वेळ नाही असं सांगू शकतोस येत नाही, सुचत नाही हे सांगायचं कशाला?" "वेळ आहे, जागा आहे. पण आत्ता सुचत नाह...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...