Photo Courtesy- Sushil Ladkat दोन कोल्हे एका निवांत दुपारी जेवणं वगैरे उरकून झाडाखाली गप्पा मारत बसले होते. त्यांना तिथून थोडं दूर मात्र नजरेच्या टप्प्यात सिंह आणि हत्ती शांतपणे बसून गप्पा मारतायत असं दिसलं. सिंह आणि हत्तीला उद्देशून कोल्ह्यांचं बोलणं सुरु झालं. “त्यांचं बरंय राव...” “का रे?” “बघ ना.. एक तर जंगलाचा राजा सिंह.” “हं... आणि दुसरा बेताज बादशाह अर्थात अनभिषिक्त राजा हत्ती...” “यांना चुकून पण हात लावायची कोणाची हिम्मत नाही.” “हे खरंय.” “बघ ना... तसं आरामाचं आयुष्य नाही का...?” “कष्ट आपल्यालाच रे...” “नाहीतर काय... किती वेळा छोट्या छोट्या शिकारी आपण शोधत बसतो.” “आणि यांचे मात्र एकदम राजेशाही थाट. छोटी शिकार बघत पण नाहीत.” “आणि तो हत्ती...” “भाऊ, त्याच्याबद्दल आपल्याला respect आहे.” “असं का?” “त्याची जगण्याची पद्धत- जियो और जिने दो.” “ते आहे. पण त्याला सुद्धा कसली भीती नाही.” “हो न... त्यांचं बरंय राव.” इकडे सिंह आणि हत्तीचं बोलणं अजूनच interesting होतं. हत्तीचं गवत चरणं चालू होतं. सिंह शांत बसला होता. सिंह- भाऊ, तुमचं बरंय राव.. ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...