| A Click by: Varun Bhagwat |
वडील आपल्या ११ वर्षांच्या मुलाशी बुद्धिबळाचा खेळ खेळत होते. मुलगा
जिंकत होता किंवा त्याला वाटत असावं की आपण जिंकतोय. मुलगा बाबांना म्हणत होता, “काय
बाबा, तुमच्याकडे बाकी महत्त्वाच्या खेळाडूंपेक्षा प्यादीच जास्त शिल्लक आहेत. या
प्याद्यांनी तुम्ही जिंकणं आणि राजाला वाचवणं अशक्य आहे.” बाबा फक्त हसले. मुलाला
म्हणाले, “तुला मी सिंह आणि त्याला disturb करणाऱ्या उंदराची गोष्ट सांगितली नाही
ना?” मुलगा विचार करत म्हणाला, “नाही हो. कोणती?”
बाबा सांगू लागले, “सिंह म्हणजे जंगलचा राजा. आता एक उंदीर चुकून
सिंहाच्या अंगावर चढला. सिंहाची झोप disturbed झाली. तो भयंकर संतापला. उंदराने
विचार केला की आता काही आपली खैर नाही आणि पटकन तो म्हणाला, “महाराज, अभय द्या. मी
भविष्यात कधी ना कधी तुमच्या कामी नक्की येईन.”
सिंह मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अस्स?” उंदीर विश्वासाने म्हणाला, “तुम्ही
आत्ता हसताय. पण मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भविष्यात नक्की तुमच्या उपयोगी पडेन.”
सिंहाला त्याच्या धैर्याचं कौतुक वाटलं. त्याने उंदराला सोडून दिलं.
काही दिवस लोटले. एकदा काही शिकारी जंगलात आले. त्यांनी या सिंहाला
जाळ्यात अडकवलं. तो जाळ्यात असून सुद्धा त्याला पकडण्याची कोणाची हिम्मत होईना. ते
strategy आखू लागले. सिंह आत्ता तर जाळ्यात अडकलाय असा विचार करून ते दुसरीकडे
जाऊन विचार करू लागले. सिंह त्यांच्या नजरेआड गेला आहे असं जाणवताच संधीचा फायदा
घेत सिंहाने काही दिवसांपूर्वी सोडून दिलेला उंदीर सिंहापाशी आला. सिंहाला तो अशा
वेळी तिथे पाहून आश्चर्य वाटलं. उंदीर एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्याने पटापट सिंहाभोवतीचं
जाळं कुरतडून टाकलं. सिंह वाचला होता. “मी तुमच्या उपयोगी पडेन” हे आपलं वचन उंदराने
पाळलं होतं.”
“बाबा मग ते शिकारी होते त्यांचं काय झालं? त्यांना सोडलं नसेल
सिंहाने.” मुलगा उत्सुकतेने म्हणाला.
“व्वा. हा प्रश्न आम्हाला कधी पडला नाही. तुला पडला हे चांगलंय. पण
या गोष्टीत शिकण्याच्या दृष्टीने त्या पेक्षा सुद्धा काहीतरी महत्त्वाचं आहे. ते
म्हणजे उंदरा सारख्या छोट्या प्राण्याने सिंहाचे अर्थात जंगलाच्या राजाचे प्राण
वाचवले. याचाच अर्थ कोणालाही कमी लेखू नये.” बाबा मुलाचे पुढे आलेले केस मागे
सरकवत म्हणाले.
“हां... good learning” मुलगा विचार केल्यासारखा म्हणाला.
“हो ना... मग good learning apply पण करा.”
“म्हणजे?” मुलगा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.
“आमच्या प्याद्याला कमी लेखू नका.” बाबा मिश्कीलपणे हसत म्हणाले.
मुलगा बुद्धिबळाच्या पटाकडे पाहू लागला.
बाबा पुढे म्हणाले, “आणि शत्रूबाबत गाफील तर बिलकुल राहू नका.” बाबांनी
पुढची चाल खेळली आणि म्हणाले, “आणि मगाशी तू म्हणालास ना की बाबा मग ते शिकारी
होते त्यांचं काय झालं, तर त्यांनी तिथून धूम ठोकली. जशी पळापळ आता तुझ्या राजाची
होईल.”
मुलगा आश्चर्याने म्हणाला, “म्हणजे?”
बाबा म्हणाले, “म्हणजे हा माझ्या प्याद्याकडून तुझ्या राजाला चेक...
अब भागो...”
-वरुण भागवत
झकास !
ReplyDeleteछान
ReplyDeleteझकास
ReplyDeleteMast
ReplyDeleteMast
ReplyDeleteमस्त,छान. असंच काहीबाही लिहीत रहा.
ReplyDeleteमस्त...
ReplyDeleteMastach...
ReplyDeleteKhupch Chan
ReplyDeleteMastach
ReplyDeleteMastach
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDelete