| A click by: Varun Bhagwat |
कौरवांचा जावई जयद्रथ ह्याने चक्रव्यूहामध्ये फसलेल्या अभिमन्यू ला
कपटाने मारलं. अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा. अर्जुनाला ही बातमी कळली. त्याला अतीव
दुःख झालं. याच बरोबरीने त्याचं मन सूडाच्या भावनेने पेटून उठलं. त्याने पुढचा
मागचा कसलाच विचार न करता प्रतिज्ञा घेतली की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी मी
जयद्रथाला संपवेन. जर मी असं करू शकलो नाही तर अग्निकुंडात उडी मारून स्वतःला
संपवेन.
जयद्रथ नीच तर होताच आणि घाबरट सुद्धा होता. ही प्रतिज्ञा
त्याच्यापर्यंत पोचली आणि घाबरून तो लपून बसला. जयद्रथाला शोधणं गरजेचं होतं. कारण
शोधलं नसतं तर प्रतिज्ञेनुसार अर्जुन स्वतःला संपवणार होता. दिवस सुरु झाला.
माध्यान्ह उलटली. संध्याकाळ होण्यास अगदी थोडा वेळ बाकी होता. जयद्रथ सापडेना.
एकाएकी अंधार झाला. तशी अर्जुनाने अग्निकुंडात उडी घेण्याची तयारी केली. नीच
जयद्रथाला मोह आवरेना. तो अर्जुनाचा शेवट पाहण्यासाठी लपून बसलेला बाहेर आला. कारण
प्रतिज्ञेप्रमाणे आता त्याला भीती नव्हती. त्याच्या दृष्टीने सूर्य मावळला होता. तो
अर्जुनाला सामोरा गेला.
इतका वेळ शांत असणारा श्रीकृष्ण आता त्याची खेळी खेळणार होता. एकाएकी
सूर्य दिसू लागला. कोणालाच काही कळेना. कृष्णाने काही काळासाठी सूर्यग्रहण केलं
होतं. त्यामुळे अचानक अंधार पडला होता. सूर्य मावळायला अवकाश होता.
| A click by: Varun Bhagwat |
कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ... उचल
तुझं धनुष्य आणि कर याचा वध.”
अर्जुनाने जयद्रथाला मारलं. प्रतिज्ञा पूर्ण झाली.
पण इथे कृष्णाची शिकवण महत्त्वाची आहे. आपण यातून शिकण्यासारखं असं
की प्रतिज्ञा म्हणजेच commitment असं म्हणूया. Commitment देताना सारासार विचार
झाला पाहिजे.
आपण काय commitment देतोय?
त्याचे दूरगामी परिणाम काय होतील?
आपलाच जीव आपण जेव्हा पणाला लावतोय तेव्हा त्यातून जे साध्य करायचं
आहे ते साधलं जाणार आहे का?
आपण खरे असलो तरी समोरचा खरा आहे का? अर्जुनाने विचार केला असेल की
समोरासमोर युद्ध करेल जयद्रथ. कारण अर्जुन पळपुटा नव्हता. पण जयद्रथ होता.
त्यामुळे शत्रूला जाणून घेतलं पाहिजे त्याला तोडण्याआधी!
Commitment विचारपूर्वक दिली पाहिजे. शत्रूनुसार नीती बदलता आली
पाहिजे. जर शत्रू कपट करतोय तर त्या भेकड मनुष्यासाठी आपण आपला जीव का पणाला
लावायचा? इथे लागते कृष्णनीती!
काही जण नुसते बोलतात. ही पोकळ commitment झाली.
काही जण बोलतात ते करून दाखवतात.
याला धैर्य लागतं.
काही जण करून मोकळे होतात. बोलण्यापेक्षा करण्याला महत्त्व देतात.
जसं कृष्णाने केलं आणि त्याच्या करण्यातून इतरांना शिकवलं. इथे results ना महत्त्व
होतं. जे साध्य झालं होतं.
कृष्णाच्या दृष्टीने Commitment ही जयद्रथाला मारायची होती. दु:खात
असताना सुद्धा शांतपणे योजना आखण्याची होती.
हे सगळं अर्जुनावर सुद्धा उलटू शकलं असतं, पण तिथे कृष्ण होता.
त्याने सावरलं, युक्ती लढवली. रागातून दिलेली commitment आपल्यालाच गोत्यात आणू
शकते. प्रत्येकाला कृष्ण सापडेल का? तर त्याच्या ह्या शिकवणी मधून शोधला तर सापडेल...
-
वरुण भागवत
Agadi barobar
ReplyDeleteDhanyawad!
DeleteVery true, nice analysis...
Deleteखुपच सुंदर लिहिले 🙏
ReplyDeleteThanks
Deleteवा! मस्त !
ReplyDeleteThanks
Deleteयाला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल
ReplyDeleteयाला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल
ReplyDeleteव्वा... खरंय.
DeleteNice Bro
ReplyDeleteThanks
Deleteएखादी गोष्ट कोण करतोय यालाही महत्व आहेच ना उदा. अमृत पिणे चांगलं पण तेच अमृत राहू पिला तेव्हा ते त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरलं या उलट विष पिणे वाईट पण हेच विष जेव्हा शंकराने पिलं तेव्हा ते विष त्याच्या गळ्यातील दागिना झालं, नीलकंठ. इथे अर्जुन होता व त्याची बाजू न्यायाची होती.
ReplyDeleteYes...
DeleteSahi ye
ReplyDeleteम्हणून तर म्हणतात ना माणूस जो काही असतो तो त्याच्या निर्णयामुळे असतो. पण योग्य मांडलय
ReplyDeleteCommitment
ReplyDeleteWaa Chan Varun
ReplyDeleteNice re Varun��������
ReplyDeleteCommitment देताना किती विचार केला पाहिजे, हे खूप छान गोष्टीतून सांगितले आहे.
ReplyDelete