Skip to main content

त्यांचं बरंय राव...

Photo Courtesy- Sushil Ladkat

दोन कोल्हे एका निवांत दुपारी जेवणं वगैरे उरकून झाडाखाली गप्पा मारत बसले होते. त्यांना तिथून थोडं दूर मात्र नजरेच्या टप्प्यात सिंह आणि हत्ती शांतपणे बसून गप्पा मारतायत असं दिसलं. सिंह आणि हत्तीला उद्देशून कोल्ह्यांचं बोलणं सुरु झालं.

“त्यांचं बरंय राव...”

“का रे?”

“बघ ना.. एक तर जंगलाचा राजा सिंह.”

“हं... आणि दुसरा बेताज बादशाह अर्थात अनभिषिक्त राजा हत्ती...”

“यांना चुकून पण हात लावायची कोणाची हिम्मत नाही.”

“हे खरंय.”

“बघ ना... तसं आरामाचं आयुष्य नाही का...?”

“कष्ट आपल्यालाच रे...”

“नाहीतर काय... किती वेळा छोट्या छोट्या शिकारी आपण शोधत बसतो.”

“आणि यांचे मात्र एकदम राजेशाही थाट. छोटी शिकार बघत पण नाहीत.”

“आणि तो हत्ती...”

“भाऊ, त्याच्याबद्दल आपल्याला respect आहे.”

“असं का?”

“त्याची जगण्याची पद्धत- जियो और जिने दो.”

“ते आहे. पण त्याला सुद्धा कसली भीती नाही.”

“हो न... त्यांचं बरंय राव.”

 

इकडे सिंह आणि हत्तीचं बोलणं अजूनच interesting होतं. हत्तीचं गवत चरणं चालू होतं. सिंह शांत बसला होता.

सिंह- भाऊ, तुमचं बरंय राव..

हत्ती- का रे?

सिंह- नाही, खात खात बोलता, बोलत बोलत खाता... कसलं टेन्शन नाही. मस्त एखादी धून ऐकत असल्यासारखे कान हलवत राहता.

हत्ती- तुला तरी कसलं टेन्शन आहे?  बादशाह आहेस ना तू तर?

सिंह- काय सांगू माझी व्यथा?

हत्ती- तुझी पण व्यथा असते?

सिंह- तुम्हाला माहितीये मला झोप किती प्रिय आहे. आजकाल मानवी वस्ती जंगलाच्या जरा जवळ आलीये. या माणसांकडे एक विचित्र प्राणी असतो कोंबडा नावाचा.

हत्ती- विचित्र म्हणू नकोस. अनेकांचा favourite असतो तो.

सिंह- असेना का... त्यांचं बरंय.

हत्ती- पण तुला त्या कोंबड्याचा काय त्रास?

सिंह- आरवतो जोरात पहाटे. दचकून उठतो मी. पुन्हा झोप नाही. माझं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय...


हत्ती हसत कान हलवू लागला.


सिंह- हां, हसा... तुम्हाला काय कळणार माझा त्रास... तुम्ही हसा आणि कान हलवत बसा.

हत्ती- तुला काय वाटतं रे... त्रास तुला एकट्याला आहे? आणि मी हे कान मजा म्हणून हलवत नाही.

सिंह- मग?

हत्ती- बारीक बारीक चिलटं उच्छाद आणतात. माझं कान हलवणं तुम्हाला बघायला लयबद्ध वाटतं. माझ्यासाठी मात्र तो त्रास असतो. तुझं काय रे आणि... कोंबडा आरवतो म्हणे... मानसिक स्वास्थ्य... oh come on...

सिंह- तुम्हाला पण आहेच म्हणजे त्रास. पण अहो, अशी अर्धवट झोप घेऊन शिकार करणं आणि त्यात हवी तशीच शिकार मिळवणं हे challenge असतं.

 

बोलता बोलता सिंहाची नजर लांब बसलेल्या कोल्ह्यांकडे गेली.

सिंह- ते बघा ते... कसलाच त्रास नाही. छोट्या छोट्या मिळेल त्या शिकारी करून समाधानी राहतात. आम्हालाच मोठी शिकार लागते.

हत्ती- या कोल्हयांना नाही मारत तू?

सिंह- इतने छोटे शिकार से मेरा क्या होगा? त्यामुळे आमच्या पासून पण ते safe. साली मजाच आहे.

त्यांचं बरंय राव.

 

इकडे सिंहाच्या गुहेत सिंहीण आणि पिल्लं होती. पिल्लांनी उच्छाद मांडला होता. वैतागून सिंहीण स्वत:शीच म्हणाली, “ही कार्टी मलाच छळतात.. हे गेले हत्तीशी गप्पा मारायला. आमच्या ह्यांचं बरंय राव.”

 

-       वरुण भागवत


 


Comments

  1. खरंच खूप बरंय ! मस्त !

    ReplyDelete
  2. तुझं बरंय राव! लै भारी लिवतो तू

    ReplyDelete
  3. गोष्ट एकदम मस्त, खरं आहे प्रत्येकाला वाटत दुसऱ्याच बरंय राव पण प्रत्येकाला काहींना काही प्रॉब्लेम असतातच आणि ते त्याच्या साठी नक्कीच इतरांपेक्षा मोठे असतात 😊😊

    ReplyDelete
  4. Bharich!
    Tuzymule khup navin kisse aani Kadihi na aikalely stories vachayla milatat..
    Thank you Varun!

    ReplyDelete
  5. वरूण खूप छान लिहिलंयस, दुरून डोंगर साजरे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...