A click by: Varun Bhagwat चपळता शिकावी तर चित्त्याकडून! कधी हा प्राणी फार जास्त सुटलाय (overweight झालाय) किंवा फार वाळलाय (underweight झालाय) असं कधी ऐकिवात आणि पाहण्यात येत नाही. हा कायमच fit! असा हा fit चित्त जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो. दुसऱ्या बाजूला असतो कळप! नुसता कळप नाही.. दुबळ्या प्राण्यांचा कळप.. हे असे प्राणी ज्यांना बजावलेलं असतं की बाळा कायम कळपात राहा.. म्हणजे तू safe राहशील. कळप सोडू नकोस. हे जंगल फार निष्ठुर आहे. बाळ ऐकतं. कळपात राहू लागतं... कळपाच्या pace नि त्या बाळाचं आयुष्य सरकू लागतं. निवांत.. कळपामध्ये जसे सगळे जण वागतील तसं बाळ पण वागू लागतं. त्यांच्यासोबत मिळेल ते खाऊ लागतं. इकडे छोटा चित्ता मात्र आत्तापर्यंत वडिलांकडून बाळकडू घेऊन independent व्हायला लागलेला असतो. त्याला स्वातंत्र्याची भेट मिळालेली असते, हवं तिथे फिरण्याची मुभा असते.. पण त्या सोबत जबाबदारी आलेली असते हळूहळू स्वतःची शिकार स्वतः मिळवण्याची! मोठा होऊ घातलेला चित्ता आपल्या एका भावंडासह निघतो शिकारीला! इकडे कळप एकमेकांना बांधून थांबलेला असतो आणि वेळ आली की पुढे जात अ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...