Skip to main content

Stress आणि उंट


A Click by: Varun Bhagwat


रमा आणि शोभा, Psychology शिकणाऱ्या २ मैत्रिणी lecture नंतर जवळच्या restaurant मध्ये गेल्या. थोडंसं पोटात पडल्यावर आज जे lecture झालं त्यासंबंधी दोघींची चर्चा चालू होती.

रमा थोडा विचार करत म्हणाली, “Stress ही एक अशी गोष्ट आहे जी दिसत नाही.”

शोभा त्यावर बोलली, “खरंय. पण दिसत नसली तरी direct affect करते. पण ना कधीकधी अगदी छोटी गोष्ट असते, पण ती सुद्धा कसा stress create करते हे मात्र मला झेपत नाही.”

“छोटी गोष्ट as in?”

“अगं रमा, अनेकदा कारण किती फालतू आहे असं दिसतं पण तेवढ्यावरून एखाद्या माणसाचा ताबा सुटतो किंवा he/ she breaks down.”

“हं...”

“हं काय अगं? थोडासा stress पण bear करता येत नाही का?”

“तसं नाहीये ते शोभा.”

“मग कसं आहे?”

“दिसताना एखादी गोष्ट छोटी दिसते.  पण ती अनेकदा निमित्तमात्र असते. नुसती निमित्तमात्र असते म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतं की प्रत्येकाचं एक सहन करण्याचं limit असतं, the moment you cross that limit, तो माणूस पूर्ण खचतो शोभा.”

“तुला नक्की काय म्हणायचंय?”

“हे बघ ते limit ओळखता आलं पाहिजे. एखादा काम करतोय म्हणून त्याला कामं देतंच राहणं आणि त्यानेसुद्धा ते स्वीकारत राहणं (कदाचित नाईलाजाने) हे काम देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी खूप महागात पडू शकतं.”

“मला संदर्भ नाही लागत आहे.”

काहीतरी आठवल्यासारखं करत रमा म्हणाली, “Oh... right. तू आज थोडी late आलीस ना lecture ला. तू सुरुवातीची सरांनी सांगितलेली एक गोष्ट miss केलीस.”

“कोणती?”

“गोष्ट फार simple आहे but if you can relate to what we are talking right now, मग जास्त नीट झेपेल.”

“सांग ना.”

“गोष्ट पूर्वीची, जेव्हा उंटाच्या पाठीवर सामान लादून नेलं जात असे. एका व्यापाऱ्याने असंच त्याच्या उंटाच्या पाठीवर सामान लादलं. त्याला आपल्या उंटाची capacity खरंतर माहित होती. ती check करण्यासाठी त्याच्याकडे भारी उपाय होता. तो उंटाला खाली बसवत असे, त्याच्या पोटाखाली वीट ठेवत असे आणि पाठीवर सामान लादत असे. वीट ज्या क्षणी फुटायची त्या क्षणी व्यापाऱ्याला समजायचं हे उंटाचं tolerance limit. मग तो अजून सामान न लादता त्याला पुढे नेत असे.”

“Measurement of stress...”

“हो पण त्यातून व्यापारी शिकायचं ते शिकला नाही.”

“म्हणजे?”

“एकदा असंच सामान लादून उंटाला घेऊन चालला असताना त्यांना रस्त्यात एक काडी घेऊन जाणारी मुंगी भेटली. मुंगी म्हणाली, “व्यापारी दादा, मला ही काडी जड होतेय. तुमचा उंट इतका मोठाय. इतकं सामान घेऊ शकतो. जरा वेळ काडी घेऊ दे ना माझी.” व्यापाऱ्याने विचार केला एका काडीने काय होणारे असं म्हणत त्याने ती काडी उंटाच्या पाठीवर लादली. मी मगाशी म्हणाले ना, एखादा काम करतोय करतोय म्हणून त्याला कामं देतंच राहणं आणि त्यानेसुद्धा ते स्वीकारत राहणं (कदाचित नाईलाजाने) हे काम देणाऱ्यासाठी आणि काम घेणाऱ्यासाठी खूप महागात पडू शकतं.”

“पण इथे कुठे असं काय घडलं?”

“शोभा, ज्या क्षणी ती काडी व्यापाऱ्याने उंटाच्या पाठीवर लादली त्या क्षणी उंटाची पाठ मोडली आणि तो खाली बसला.”

“Oh... so ही सहनशक्तीची मर्यादा होती, काडी ही निमित्तमात्र ठरली.

“Yes आणि capacity पेक्षा जास्त झालं की काडी सुद्धा खूप असते. त्या tolerance limit चं भान ठेवावं. नाहीतर मग माणूस बोलून स्फोट करतो किंवा त्या ताणाने पूर्ण खच्ची होतो या उंटासारखा."

 

-वरुण भागवत     


Comments

  1. उत्तम दृष्टांत...

    ReplyDelete
  2. Yes...
    Perfect observation...
    Nice writing of skill..
    🙋👌👌👌

    ReplyDelete
  3. खरं आहे प्रत्येकाने आपली limit ओळखलीच पाहिजे तसेच दुसऱ्याची limit समजून घेतली पाहिजे म्हणजे दोघांचंही जीवन सुकर होईल, आजकालच्या कॉर्पोरेट युगात हे नीट जपलंच पाहिजे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...