| A click by: Varun Bhagwat |
खूप मोठे आणि यशस्वी उद्योगपती सुरंजन यांना
नुकतच एक award मिळालं होतं. त्याप्रित्यर्थ
त्यांचा interview चालू होता. interviewer अजित चे प्रश्नांवर प्रश्न चालू होते.
त्याला सुरंजन फार सुरेख उत्तरं देत होते.
“सर्वांनीच बोध घ्यावा असे तुमचे विचार आहेत
sir.” अजित म्हणाला.
सुरंजन फक्त हसले.
“सर, तुम्ही यशाच्या ज्या शिखरावर सध्या आहात
तिथून सगळीकडे बघताना कसं वाटतंय? सगळं आता फार सोपं वाटत असेल नाही?”
“बिलकुल नाही.”
अजितला उत्तर अनपेक्षित होतं. तो म्हणाला, “तुम्हाला
रोखणारा कोण आहे? तुम्ही top वर आहात असं म्हणायला हरकत नाहीये.”
“Top वगैरे फार तात्पुरतं असतं.”
“As in?”
“आपण कोणत्याही शिखरावर पोहोचलो तरी कोणतीच गोष्ट
casually घेऊन चालत नाही. तू म्हणतोस तसं so called यशाच्या शिखरावर असताना तर
मुळीच नाही. You need to be alert all the time. कोणालाच कमी लेखायचं नाही.”
“ते तर खरंय सर.”
“खूप खरंय. माझ्या उद्योगाच्या कारकिर्दीच्या
सुरुवातीलाच मी हा धडा शिकलो की Never take anyone and anything for granted. हे
ही शिकलो की दुसऱ्याच्या अनुभवावरूनही आपण शिकूच शकतो.”
“असं नेमकं काय घडलं?”
“आज तारीख काय आहे?”
“२५ जून.”
“हीच तारीख आणि काही वर्षं मागे जाऊया.”
“मला कळलं नाही.”
“India ने आपला पहिला- वहिला cricket world
cup केव्हा जिंकला?”
“१९८३.”
“हो. २५ जून १९८३.”
“पण त्याचा not taking anything for granted
शी काय संबंध?”
“ऐक तर खरं. त्या काळी West-Indies ही अभेद्य
team होती. त्यांनी already २ world-cups खिशात टाकले होते. १९८३ ला अर्थात तिसऱ्या
world cup ला final match ला सुद्धा ते पोचले आणि तिसरा world cup खिशात घालायची तयारी करत होते. भारत
विरुध्द वेस्टइंडीज असा सामना रंगणार होता. तुमच्या सारख्या अनेक news वाल्यांनी
तर जवळपास declare केलं की वेस्टइंडीज तिसरा world cup जिंकायच्या तयारीत!”
“पण जिंकलो आपण. India...”
“Right.”
“असं का झालं असेल?”
“कारण वेस्टइंडीज ने India ला फार casually
घेतलं.”
“Yes. अवघा १८३ score भारत करू शकला होता. ते
target विंडीजला ६० overs मध्ये गाठायचं होतं. Match हातातली होती. पण ह्यात काय
विशेष आहे असा काहीसा त्यांचा विचार झाला असावा आणि यशाच्या उच्च शिखरावर असताना
दाणकन खाली आपटायची वेळ त्यांचावर आली.”
“True.”
“हे झालं तू मगाशी मला विचारलेल्या प्रश्नाचं
उत्तर. आपण कुठेही पोहोचलो तरी झाकीत जायचं नाही. काम पूर्ण होईतो celebrate
करायची गडबड करायची नाही. कारण जोपर्यंत result लागत नाही तोपर्यंत कोणतीच team
जिंकलेली नसते.”
- वरुण भागवत
Absolutely! 100% true! Very well written! 🙌
ReplyDeleteYes! Abasulitaly correct!
ReplyDeleteGreat writing!
📝👌👍🙋
खूप छान!
ReplyDelete👍👍👍
ReplyDelete