Skip to main content

Posts

लिही ना...

  A click by: Varun Bhagwat   - आज पूर्ण पान कोरं सोडलंस ? - सुचलं नाही. - सुचलं नाही की तसा प्रयत्न केला नाहीस. - केला ना! - मग का लिहिलं नाहीस ? - अरे.. मी केला प्रयत्न.. - मला सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न.. - अरे तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का ? - जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत. - पण मी. - हे बघ. मला कळतंय. - काय कळतंय ? - तुला quality भारीच हवी आहे तुझ्या लिखाणाची. - अर्थात. - आणि म्हणूनच तू माझ्यावर अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस. - कदाचित. - कदाचित नाही.. हेच खरं आहे. - बरं मान्य. - तू लिहिलेलं चांगलं आहे की नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..? - म्हणजे ? - अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत नाहीये. - हां. - पण जोपर्यंत तू माझ्यावर प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो. लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला...

वेड्या मना...

  A click by Varun Bhagwat मन गांजलेलं असतं. मन थकलं- भागलेलं असतं. मन कंटाळलेलं असतं. मन रुसलेलं असतं. मन चिडलेलं असतं. मन त्रासलेलं असतं. हे मन असतं. आज असं तर उद्या तसं असतं. किती समजावलं तरी त्याला हव्या त्याच गाडीने ते प्रवास करत असतं. पूर्वसूचना देऊनही त्याला हव्या त्याच वेगाने ते धावत असतं. मन अवखळ असतं. मन चपळ असतं. मन खोलात जाऊन विचार करत असतं. मन खलबतं मांडत राहत असतं. मन स्वतःलाच छळत राहत असतं. मन विचार करत असतं पण अतीशय अविचाराने वागत असतं. मन कधी पाठिंबा देत असतं तर कधी विरोध करत असतं. मन स्वतःच स्वतःशी विरोधाभासी वागत असतं. मन वेडं असतं. मन शहाणं असतं. मन करत असतं. शरीर भरत असतं. कधी शरीर काही करून बसत असतं. मग मन ते भरत बसत असतं. मनाला विचारावं तर ते मनासारखं वागणार असं म्हणत असतं. मन सतावत असतं. मन मनवत असतं. मन गच्च असतं. मन मोकळं असतं. मन मनात अराजक माजवत असतं. मनच मनाची समजूत घालत असतं. मन हरत असतं. मन जिंकत असतं. मन झुरत असतं. मन प्रेमात पडत असतं. मन खात असतं. मन कुठेही, कधीही जात असतं. मन मानेल ते सांगत असतं. मन मानेल तसं करायला लावत असतं. मन रुसत असतं. मन फसत ...

शांत, निवांत, मनातलं!

  A click by Varun Bhagwat एका शांत, निवांत स्थळी मी जाऊन बसलो. एकदम जाणवलं की ही शांतता किती गरजेची होती आणि कितीतरी दिवसापासून हवीशी होती. मिळालं नाही की त्या गोष्टीचं महत्त्व जास्त समजतं हा मनुष्यस्वभाव वेळोवेळी दिसतो. आपण शांतता शोधतो, ती शोधेपर्यंत किती कल्लोळातून जावं लागतं. किती कोलाहल, दंगा, गडबड, गोंधळ चालू असतो आणि या दिव्यातून पार झालं की मग लाभते शांतता. या सगळ्यातून न जाताच शांतता मिळेलही पण मग आत्ता जितकं जाणवतंय तितकं त्या शांततेचं महत्त्व जाणवणार नाही, समजणार नाही. माणूस एक अजब प्रकार आहे. फार शांतता झाली तरी सुन्न पडतो. काय करावं समजत नाही. सारखा समतोल हवा असतो. आयुष्यात इतका जर समतोल असता तर आयुष्याची रेषा (ECG) सरळच राहिली असती. पण असं चालणार नाही. ती रेष सरळ झाली की विषयच संपला. चढ आहे म्हणून उताराचं महत्त्व आहे आणि उतार आहे म्हणून चढाला किंमत आहे आणि तो चढ चढून वर जायला पण फार किंमत मोजावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे. या शांततेच्या महत्त्वाचा शोध घेताना कितीतरी गोष्टी शोधल्या जातात. आपला आपल्याला श्वासोच्छ्वास ऐकू आला की कळतं आपण आहोत. हा श्वास आपलं जिवंत असणं अध...

सल्लागार

  A click by Varun Bhagwat म ला फार गंमत वाटते न मागता सल्ले देणाऱ्या लोकांची. मला नको असेल यांचा सल्ला तर म्हणतात तुझ्या भल्यासाठी आहे हे! त्यांना म्हणावसं वाटतं की अहो तुम्ही कसं काय ठरवलं की माझं भलं कशात आहे ते! सटवाई ने ५व्या दिवशीच माझं नशीब लिहून ठेवलंय. ते तुमच्या सल्ल्याने बदलेल का? नशीबाचं जाऊ द्या. सल्ला दिला इथवर ठीक! तो ऐकलाच पाहिजे हा यांचा अट्टाहास! यांच्या मते, यांच्या सल्ल्याने काहीतरी revolutionary म्हणजेच क्रांतिकारी बदल होणार असतो आपल्या आयुष्यात. योग्य माणसाने, योग्य ठिकाणी, योग्य टप्प्यावर, योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि आपण तो घेणं या साठी त्या योग्य level चं नातं असावं लागतं. तरच सल्ला देणाऱ्याचा मान राहतो आणि घेणाऱ्याला कदाचित सल्ल्याचा फायदा होतो. पण यातली ही जी उगाच सल्ला देणारी माणसं असतात, त्यांना एकतर त्यांचं सगळं सांभाळून ही सोशल सर्व्हिस (?) करायला वेळ झालेला असतो किंवा स्वतःचं झाकण्यासाठी हे सल्लागार नावाचा पार्ट टाइम जॉब (बिनपगारी) करतात किंवा यांना मुळातच हौस असते दुसऱ्याचं डोकावून पाहण्याची. याचा अर्थ यांचं काही फार बरं चाललेलं असतं असा नाही. पण...

Common man होणं सोपं नसतं!

  A click by Sushil Ladkat Common man होणं सोपं नसतं. कित्तीतरी गोष्टींना त्याला सामोरं जायचं असतं. दाखवत नाही म्हणजे माणूस रडत नाही असं नसतं. आतमध्ये दर्या भरेल इतकं पाणी असतं. सांगत नाही म्हणजे त्याला बोलायचं नाही असं नसतं. अनेकदा मनातलं बोलायला आपलं माणूस हवं असतं. चिडला म्हणजे माणूस वाईट झाला असं नसतं. रागावणं नि रुसणं प्रेमाचं प्रतीक असतं. बोलत नाही म्हणजे प्रेम नाही असं नसतं. अबोल प्रेमाने कितीतरी मनांना जोडलेलं असतं. एकटा राहतो म्हणजे सोबत नको असं नसतं. सोबतीसाठी मन खरंतर वेडंपिसं असतं. सोबतीला सगळे आहेत म्हणून एकटं राहणं नापसंत नसतं.  Space हवीय असं वाटणं स्वाभाविक असतं. वरती हसला म्हणजे आतून खुश आहे असंही नसतं. आतल्या दुःखाला संपवून टाकत हास्यतुषाराने आयुष्य परिपूर्ण जगायचं असतं. दुरावला म्हणजे त्याला परत यायचं नाही असं समजायचं नसतं. त्याला मनापासून मनवणं गरजेचं असतं. स्पष्ट बोलला म्हणजे दुष्ट झाला असं नसतं. चांगलं तेवढं उचलत बाकीचं बाजूला सारायचं असतं. संबंध संपला म्हणजे आठवणीतही नाही असं नसतं. आठवणीशिवाय आयुष्य अर्धवट असतं. सामान्य आहे म्हणजे त्याची स्वप्न नाहीत असं...

मन- मस्त!

A click by Varun Bhagwat एक सुंदर वाक्य वाचनात आलं आणि लक्षात आलं की किती खरं आहे ते. लिहिलं होतं की काही तास एखाद्या गोष्टीवर खूप विचार करण्यापेक्षा काही मिनिटं त्याच्यावर काम करणं अथवा काही मिनिटात ते करून टाकणं हे जास्त श्रेयस्कर आहे. असं केल्याने आपलं मन थाऱ्यावर राहतं. नवा विचार करण्यासाठी डोकं जागेवर राहतं. कारण एखाद्या कामाचा जेव्हा नुसता विचारच केला जातो (कृतीविना), तेव्हा काहीही घडत नाही. वाया जातो तो वेळ, वाया जाते ती ऊर्जा ती सुद्धा निष्कारण! किती विचार करायचा आणि कुठे थांबवायचा हे आपलं मन ठरवतं. आता मन म्हणजे आपणच, मव आपणच ते वेळेत ठरवायचं आणि विचार करून कृती करून टाकायची. यामुळे त्याच गोष्टी आवण घोळत बसत नाही, पटकन पुढे जातो अर्थात पुढची वाटचाल सुरू करतो.  होतं असं की याने आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहायला मदत होते. गमतीचा भाग असा, खरं तर हा भाग गमतीचा नाही पण एकूणच आपल्याकडे मानसिक आरोग्याला फार कमी लेखलं जातं, कमी महत्त्व दिलं जातं.  शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यालाही महत्व आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यावर बोलणारे अनेक लोक आहेत पण तरीसुद्धा त्याकड...

पक्षी उडाला आकाशी...

A click by Sushil Ladkat नावेत बसलो होतो. वल्हवताना होईल तेवढाच पाण्याचा आवाज होता... बाकी निरव शांतता. पाण्यात मध्यभागी एक झाड उगवलं होतं, झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर एक सुंदर पक्षी बसला होता. मी तो पक्षी बघत होतो. फांदीसारखी फांदी ती, एकदम हलकी. त्या फांदीसोबत हा डुलत होता. मला जाणवलं आपण हे पुस्तकात वाचलं होतं की पक्ष्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो आणि आज प्रत्यक्ष अनुभवलं. याला भीती नव्हती फांदी तुटण्याची आणि आपण पडण्याची! आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं जाणवलं. भौतिक गोष्टींमुळे येणारी safety आणि comfort zone यात मी किती अडकतो असं वाटलं. माझं घर (कदाचित वडिलोपार्जित, कदाचित मिळवलेलं, कदाचित भविष्यातलं), माझी गाडी, माझे savings नसतील तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असाच मी समज करून घेतो. डोक्यावर निवारा नसेल हा विचार मला घाबरवून सोडतो. मी जमवलेल्या माझ्या वस्तू जीवाहून जास्त जपतो. हे सगळं आहे तसं ठेवण्यात आणि जपण्यात मी माझा पूर्ण वेळ खर्च करतो. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे मला कायम या भौतिक गोष्टींचा आधार असावा ज्याने मी सुरक्षित (?) राहीन असं मला वाटतं. मी असा विचारच कर...