A click by: Varun Bhagwat - आज पूर्ण पान कोरं सोडलंस ? - सुचलं नाही. - सुचलं नाही की तसा प्रयत्न केला नाहीस. - केला ना! - मग का लिहिलं नाहीस ? - अरे.. मी केला प्रयत्न.. - मला सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न.. - अरे तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का ? - जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत. - पण मी. - हे बघ. मला कळतंय. - काय कळतंय ? - तुला quality भारीच हवी आहे तुझ्या लिखाणाची. - अर्थात. - आणि म्हणूनच तू माझ्यावर अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस. - कदाचित. - कदाचित नाही.. हेच खरं आहे. - बरं मान्य. - तू लिहिलेलं चांगलं आहे की नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..? - म्हणजे ? - अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत नाहीये. - हां. - पण जोपर्यंत तू माझ्यावर प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो. लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...