मनोज आज त्याच्या psychologist कडे गेला. एकूणच routine बोलणं झाल्यानंतर dr. साटम यांनी एकच प्रश्न विचारला- “राग पटकन येतो ना तुम्हाला Mr. मनोज?” आपल्या रागाचा आपल्याला फार अभिमान आहे अशा थाटात मनोज उत्तरला, “अर्थात.” खरंतर राग येणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. पण मनोज मात्र आपल्या रागाचं समर्थन करत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे dr. साटम यांना जाणवलं. ते शांत होते. मनोज बोलत होता, “मी रागावतो , मान्य आहे. पण आता समोरचा चुकतो किंवा कधी नाही घडत गोष्टी मनाप्रमाणे. मग येतो राग.” “यावर काही उपाय असावा किंवा करावा असं नाही वाटत का मग तुम्हाला?” dr. साटम यांनी प्रश्न केला. “रागावर उपाय असतो?” मनोजचा प्रतिप्रश्न. “ठरवला आणि योजला तर असतो.” साटम उत्तरले. “सांगून बघा मला. Try करण्याचा try करेन.” स्वत:च्याच उत्तरावर मनोज खुश झाला. डॉक्टरांनी काहीच react केलं नाही. त्यांनी मनोजच्या हातात फक्त एक चिट्ठी दिली. मनोज चिट्ठी घेऊन निघून गेला. त्याने ती चिट्ठी तिथे तरी उघडून बघितली नाही. घरी आला. नेमके त्याच दिवशी त्याचे त्याच्या पत्नीसोबत अगदी क्षुल्लक कारणावरून मतभ...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...