A click by Varun Bhagwat रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं. कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही. परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात. या सगळ्यात एक समान दु...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...