Skip to main content

Posts

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

  A click by Varun Bhagwat रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही.  परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात.  या सगळ्यात एक समान दु...

माणूस प्रेमाचा भुकेला असतो! - भाग २

  A click by Varun  प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही. प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात? 'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते. हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात! पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं. यामुळे, माणसाचं माणूसपण हरवू शकतं. निरागस मन बंडखोर बनू शकतं. प्रेमाची व्याख्या काही नाही. प्रेम विकत मिळत नाही. पण, प्रेम वाटता येतं, प्रेम वाढवता येतं. प्रेम सहज असतं. प्रेम गरजेचं अ...

माणूस प्रेमाचा भुकेला असतो!

A click by: Sushil Ladkat माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे प्रेमाची आणि प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत फार जास्त जाणवते.. पण काहींच्या वाट्याला अशाच काळात आपल्याच माणसांकडून प्रेमाची परतफेड द्वेषाने मिळते. KD नावाचा सिनेमा प्रेमाचं गणित छान मांडतो. माणसं आपल्याच माणसाच्या जीवावर उठतात हे करुप्पा दुराई अर्थात KD ने ऐकलं होतं, पाहिलं होतं; पण आपली पोरं आपल्याच जीवावर उठतील याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. वडील आता ओझं झालेत या विचाराने मुलंच आपल्या ७५ वर्षाच्या पित्याला मारायचं ठरवतात. हे कळताच करुप्पा तिथून पळ काढतो. भटकत असताना त्याला १० वर्षांचा मुलगा भेटतो ज्याचं कोणीच नसतं. प्रेम दिल्याने वाढतं हे अनुभवातून जाणणारा हा म्हातारा आणि कधीच प्रेम न मिळालेला हा कुट्टी नावाचा पोरगा यांच्यात फार जवळचं नातं निर्माण होतं. कोणीही विचार केला नसेल असा विचार कुट्टी करतो आणि करूप्पा ची bucket list बनवतो. अर्थात अशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या किंवा ज्या करायला फार आवडतील अशी लिस्ट. मग सुरू होतो नि बहरत जातो एक निखळ प्रवास. ज्यात असतं प्रेम, आपुलकी आणि जिव...

Bounce Back करणं एक challenge च!

A click by Sushil Ladkat Come back किंवा bounce back करणं हे फार risky , अवघड पण तितकंच challenging आहे. तसं म्हणलं तर कोणती गोष्ट अवघड नाही?? एखादी गोष्ट प्रथमच करून पाहणं किंवा एखाद्या नव्या गोष्टीत पदार्पण करणं कदाचित तुलनेनं सोपं! पण हे bouncing back प्रकरण आपला जीव काढतं. नवं सुरु करणं आणि पुन्हा नव्याने सुरु करणं यात दिसायला खूप छोटा फरक दिसतो. तो फरक म्हणजे फक्त 'पुन्हा' या शब्दाचा! दिसायला छोटा पण असायला फार मोठा आहे हा फरक! नवं सुरु करणं is like नवा संसार उभारणं, ज्याला कष्ट पडतात. स्वाभाविक आहे. नवंच आहे ना ते! पण नव्याने सुरु करणं म्हणजे मोडलेला, पडलेला संसार पुन्हा उभारणं! बघणाऱ्याला वाटतं या आधी हे त्याने केलंय , नव्याने करायला तितकेसे कष्ट नाही पडणार! पण किंबहुना थोडे जास्तच कष्ट पडतात! जसा एखाद्या चांगल्या batsman चा form हरवतो आणि तो team च्या बाहेर फेकला जातो. पुन्हा team मध्ये येण्यासाठीचा त्याचा struggle बघण्यासारखा असतो.. नवख्या माणसाने शिकण्यासारखा असतो. कारण यात emotions चा कल्लोळ असतो. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःबद्दल वाढलेल्या अपेक्षा, आधीचं failu...

रागाच्या भरात…

  मनोज आज त्याच्या psychologist कडे गेला. एकूणच routine बोलणं झाल्यानंतर dr. साटम यांनी एकच प्रश्न विचारला- “राग पटकन येतो ना तुम्हाला Mr. मनोज?” आपल्या रागाचा आपल्याला फार अभिमान आहे अशा थाटात मनोज उत्तरला, “अर्थात.” खरंतर राग येणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. पण मनोज मात्र आपल्या रागाचं समर्थन करत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे dr. साटम यांना जाणवलं. ते शांत होते. मनोज बोलत होता, “मी रागावतो , मान्य आहे. पण आता समोरचा चुकतो किंवा कधी नाही घडत गोष्टी मनाप्रमाणे. मग येतो राग.” “यावर काही उपाय असावा किंवा करावा असं नाही वाटत का मग तुम्हाला?” dr. साटम यांनी प्रश्न केला.    “रागावर उपाय असतो?” मनोजचा प्रतिप्रश्न. “ठरवला आणि योजला तर असतो.” साटम उत्तरले. “सांगून बघा मला. Try करण्याचा try करेन.” स्वत:च्याच उत्तरावर मनोज खुश झाला.  डॉक्टरांनी काहीच react केलं नाही. त्यांनी मनोजच्या हातात फक्त एक चिट्ठी दिली. मनोज चिट्ठी घेऊन निघून गेला. त्याने ती चिट्ठी तिथे तरी उघडून बघितली नाही. घरी आला. नेमके त्याच दिवशी त्याचे त्याच्या पत्नीसोबत अगदी क्षुल्लक कारणावरून मतभ...

लिही ना...

  A click by: Varun Bhagwat   - आज पूर्ण पान कोरं सोडलंस ? - सुचलं नाही. - सुचलं नाही की तसा प्रयत्न केला नाहीस. - केला ना! - मग का लिहिलं नाहीस ? - अरे.. मी केला प्रयत्न.. - मला सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न.. - अरे तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का ? - जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत. - पण मी. - हे बघ. मला कळतंय. - काय कळतंय ? - तुला quality भारीच हवी आहे तुझ्या लिखाणाची. - अर्थात. - आणि म्हणूनच तू माझ्यावर अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस. - कदाचित. - कदाचित नाही.. हेच खरं आहे. - बरं मान्य. - तू लिहिलेलं चांगलं आहे की नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..? - म्हणजे ? - अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत नाहीये. - हां. - पण जोपर्यंत तू माझ्यावर प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो. लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला...

वेड्या मना...

  A click by Varun Bhagwat मन गांजलेलं असतं. मन थकलं- भागलेलं असतं. मन कंटाळलेलं असतं. मन रुसलेलं असतं. मन चिडलेलं असतं. मन त्रासलेलं असतं. हे मन असतं. आज असं तर उद्या तसं असतं. किती समजावलं तरी त्याला हव्या त्याच गाडीने ते प्रवास करत असतं. पूर्वसूचना देऊनही त्याला हव्या त्याच वेगाने ते धावत असतं. मन अवखळ असतं. मन चपळ असतं. मन खोलात जाऊन विचार करत असतं. मन खलबतं मांडत राहत असतं. मन स्वतःलाच छळत राहत असतं. मन विचार करत असतं पण अतीशय अविचाराने वागत असतं. मन कधी पाठिंबा देत असतं तर कधी विरोध करत असतं. मन स्वतःच स्वतःशी विरोधाभासी वागत असतं. मन वेडं असतं. मन शहाणं असतं. मन करत असतं. शरीर भरत असतं. कधी शरीर काही करून बसत असतं. मग मन ते भरत बसत असतं. मनाला विचारावं तर ते मनासारखं वागणार असं म्हणत असतं. मन सतावत असतं. मन मनवत असतं. मन गच्च असतं. मन मोकळं असतं. मन मनात अराजक माजवत असतं. मनच मनाची समजूत घालत असतं. मन हरत असतं. मन जिंकत असतं. मन झुरत असतं. मन प्रेमात पडत असतं. मन खात असतं. मन कुठेही, कधीही जात असतं. मन मानेल ते सांगत असतं. मन मानेल तसं करायला लावत असतं. मन रुसत असतं. मन फसत ...