A click by : Sushil Ladkat अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा. आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत. छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच. कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान." असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर. अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flas...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...