Skip to main content

Posts

एकटं वाटलं आणि...

  कामाचं ठिकाण. कामात थोडया वेळाचा ब्रेक होता. मी खुर्चीवर बसलो होतो. ३ जण शेजारी होते. अचानक एकाच वेळी निरनिराळ्या कारणांनी ते तिघे उठून तीन दिशांना गेले. मी तिथे एकटाच. एकदम एकटा पडलो असं वाटलं. एकटा पडलो होतो, एकटं वाटत होतं की एकटं वाटत होतं म्हणून एकटा पडलो होतो? काही कळत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यस्त. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं. की मीच कोणाशी बोलत नव्हतो? की मी कोणाशी बोलत नव्हतो म्हणून माझ्याशी कोणी बोलत नव्हतं? की कोणी माझ्याशी बोलत नव्हतं म्हणून मी कोणाशी बोलत नव्हतो? मग नीट पाहिलं. प्रत्येक जण तिथे एकटा होता. म्हणजे माणसं खूप होती पण सगळे एकत्र नव्हते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात होता. स्वतःतच व्यस्त होता. काही जण तिथे खरोखरीच स्वतःच्या कामात व्यस्त होते. मात्र अनेक जण नुसतेच एकटे होते, जे खरंतर संवाद साधू शकत होते. अगदी सहज एकमेकांशी बोलू शकत होते. पण तसं घडत नव्हतं. ते पण माझ्यासारखंच स्वतःला एकटं समजत होते? . गंमत आहे सगळीच. मी बोलायला पुढाकार घेत नाही किंवा समोरचा घेत नाही यावरून कितीतरी संवाद होता होता राहून गेले असतील? कितीतरी ...

फुलपाखरं आणि ते दोघे!

  A click by: Varun Bhagwat ती आणि तो तलावाकाठी निवांत बसले होते. दोन फुलपाखरं बागडत होती, खेळत होती. चेहऱ्यावर सहज हसू यावं आणि क्षणभर ते टिकूनही राहावं असं ते दृश्य. क्षणभरच, कारण ते बघत असताना क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मालवलं. तो तिला म्हणाला, "या फुलपाखरांसारखं झालंय आपलं." "म्हणजे?" तिला कळेचना. "भेट होईल तो दिवस आपला. तो दिवस पूर्ण एन्जॉय करायचा, जसे आज भेटलोय." "असं का म्हणतोस?" "तू तिकडे, मी इकडे! अजून काय म्हणू?" "हं. ही फुलपाखरं पण अशीच भेटत असतील का?" तिला प्रश्न पडला. "कोणास ठाऊक? पण बघ ना, कधी का भेटेनात पण भेटतात तेव्हा फार खुश असतील असं वाटतं." "आपल्यासारखीच!" ती हसत म्हणाली. त्याला पटलं  आणि त्याने प्रतिसाद दिला, "हो गं. तुझं खरंय की आपण सारखे भेटत नाही सद्ध्या. मी तिकडे, तू इकडे. पण भेटलो की किती आनंदी असतो पण." "पण तो आनंद त्या क्षणापुरताच!" ती थोडीशी खट्टू होत म्हणाली. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, "असेल, पण पुढच्या खूप दिवसांसाठीची एनर्जी देऊन जाते ती भेट. तो...

आठवणींची पेटी!

  A click by : Sushil Ladkat अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा.  आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत. छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच.  कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान." असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर. अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flas...

पाऊस माझा सखा...

  A click by : Varun Bhagwat धबाबा कोसळणारा पाऊस. त्याला काळ्या ढगाने अजूनच लावली फूस. शांत उभी ठाकलेली वृक्षवल्ली. पावसात नाचणारी पोरं होती वल्ली. कसा कोणास ठाऊक, कोकीळ पाऊसगाणं लागला गाऊ, कोकिळेच्या प्रेमात बुडत तिच्या जवळ लागला जाऊ. चिमणा चिमणी बसले घरट्यात जसा येऊ लागला पाऊ, घरट्यामध्ये न रमणारा, उघडा पडला आळशी काऊ. मन उधाणलं. इतका पाऊस की मन बघता बघता तिच्यात केव्हाच बुडालं. ती दूर, मनी हुरहूर. पाऊसच जणू जुळवत होता आमचे चिंब सूर. मनातूनच रेखाटू लागलो तिच्या चेहऱ्यावरचा नूर. धरती वरुणमय हवी होती तिची सय मी निघालो, पावसात पोहोचलो. कोसळत होत्या संततधारा संगे होता सोसाट्याचा वारा. मन चिंब, चिंब, चिंब तळ्यातल्या पाण्यात तिचंच प्रतिबिंब. आठवायचं तरी किती? आठवणीत रमायचं तरी किती? चार्लीसारखं पावसात रडून झालं. थेंबांनी अश्रूंना पुसून टाकलं. मला वाटलं भेटेल ती तिला वाटलं भेटेन मी. पण दोघांना एकाएकी पाऊस भेटला. प्रेम आणि आठवांचा निरोप देऊन गेला. ती माझ्यात गुंतलेली, मी तिच्यात रमलेला. पावसाची धार ओसरत आलेली, मी प्रेमात आकंठ बुडालेला. पावसाचे थेंब झेलत खिडकीपाशी थांबलो. निसर्गाच्या लयीत ...

ए पोरा...

  A click by: Sushil Ladkat केतन सवयीप्रमाणे व्यायामाला एका club मध्ये जायचा. Routine ठरलं होतं. जिथे तो व्यायामाला जायचा तो एक sports club च होता. त्यामुळे club च्या member व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश नसे. आज अचानकच केतनला आतमध्ये असणाऱ्या security guard ने अडवलं. केतन member होता, पण तरी त्याला अडवलं होतं. केतनला या गोष्टीची चीड आली. नुसतं अडवण्याची नव्हे तर अडवण्याच्या पद्धतीची. Guard ने चुटकी आणि टाळी वाजवत हाताचा इशारा केला आणि म्हणाला, "कुठं चालला रे?" केतन तरीही चालत राहिला. Guard चिडला. तो वयस्कर होता तरीही केतन दुर्लक्ष करतोय हे पाहून अजून मोठ्या आवाजात मोठ्या कष्टाने थोडं जवळ येऊन म्हणाला, "विचारलेलं कळत नाही का?" केतन थांबला. झटकन म्हणून गेला, "का थांबू? इथे रोज येतो मी." "पण मी इथं नवीन आहे." "मी जुना आहे." "तुझ्या गळ्यात club चं card नाही." केतन अरेरावी करत म्हणाला, "तुम्ही आज आलाय." यावर guard चा आवाज अजून चढला आणि म्हणाला, "ए पोरा, मी काम करतोय. तू नाही मला शिकवायचं." "Card माझ्य...

साथी रे!

  A click by : Varun Bhagwat तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना." तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे." "काय?" "तुझी आठवण!" "अं..." "तुला नाही का गं येत माझी आठवण?" "येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!" "हो गं. पण आपली भेट?" "लवकरच." "नुसती आशा की खात्री?" "खात्री!" "एवढी खात्री कुठून येते?" "आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच." "पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास." "अरे काय कायमचा विरह थोडी आहे?" "हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो." "असू दे थोडा विरह." "प्रेम अजून वाढतं म्हणशील." "हो." "ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!" ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अज...

करीत राहायचं!

  A Click by: Varun Bhagwat राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते. राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते. सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?" राघव इलुसं हसला. सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?" राघव त्याच्य...