Skip to main content

गोल्डन टीम वर्क

Photo Courtesy: Sushil Ladkat

कॉलेजवयीन मुलांचा एक ग्रुप टेकडीवर व्यायामासाठी आला होता. व्यायाम करून आता सगळे थकले होते. थोडी विश्रांती घेत होते. विश्रांती घेऊन थोड्याच वेळात ते निघणार होते. मी ही तिथे त्यांच्या ग्रुप पासून थोड्या अंतरावर होतो, माझे शूज घालत होतो.

कुठल्या तरी खेळाविषयी ते बोलत होते. त्यांच्यातला एक जण म्हणाला,   “या वेळी गोल्ड मेडल बरं का!  कोणाचंच गेलं नाही पाहिजे.”  

मला साधारण अंदाज आला की हे एकाच जुनियर कॉलेज मधले असावेत आणि athletics च्या निनिराळ्या प्रकारांत यांनी भाग घेतलेला असावा. सगळ्याचं ध्येय होतं की आपल्या सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. त्यांचं स्पिरीट पाहून छान वाटलं.

तोच त्यांच्यातला अजून एक जण म्हणाला, “हो हो, सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे, मला सोडून!!

दुसरा म्हणाला, “ए रोहित, काय रे तुला सोडून म्हणजे काय?”

रोहित उत्तरला, “नाही रे, या वेळी खेळताना जरा दम लागतोय. अरे यार यश, माझं अवघड आहे....”

यश म्हणाला, “तुझी तयारी आम्ही करून घेऊ. पण म्हणायचं की गोल्ड मिळणार म्हणजे मिळणार.”

 

इतक्या वेळात माझे शूज घालून झाले होते. मी तिथून पुढे निघालो आणि हे विचार डोक्यात घोळत राहिले आणि ती Japanese गोष्ट अंधुकशी आठवली. ज्यामध्ये काही मुलांमध्ये race लागते. जो मुलगा finishing line आधी पार करेल तो विजेता आणि finishing line वर ठेवलेली सगळी chocolates त्याला मिळणार!

Race सुरु होते. सगळे धावू लागतात. तोच त्यांच्यातला एक जण अडखळून पडतो. सगळे जागच्या जागी थांबतात. सगळे मिळून त्याला उचलतात. त्याला आधार देतात. एकमेकांचा हात पकडतात. सगळे जण सोबत race संपवतात. अडखळणारा मुलगा सुद्धा त्यांचाच सोबत त्यांच्या मदतीने शर्यत संपवतो. मुळात आता ही शर्यत राहिलेलीच नसते. एकत्र जिंकलेली छोटी का होईना लढाई असते. तिथे पोहोचून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली chocolates ती मुलं वाटून खातात.

देश जपान असो वा भारत, चांगले विचार आणि team work आपल्याला यश मिळवून देतात.

 

मागे वळून पाहिलं. रोहितची दमछाक होत होती. पण गोल्ड मेडल ची लढाई जिंकण्यासाठी यश मात्र रोहितच्या यशाची तयारी करून घेत होता. त्यांच्या पाठीमागे गोल्डन सूर्यास्त अजूनच शोभत होता.

 

Photo: Varun Bhagwat

- वरुण भागवत


Comments

  1. मस्तच प्रेरणादायी

    ReplyDelete
  2. Nice.. Inspiring...

    ReplyDelete
  3. Superb.....simply great and positive

    ReplyDelete
  4. खुपच छान. असाच सकारात्मक द्रीष्टीकोन ठेवा. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. अप्रतिम... सगळ्यांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...