Skip to main content

प्यादं आणि त्याची कमाल!

A Click by: Varun Bhagwat


वडील आपल्या ११ वर्षांच्या मुलाशी बुद्धिबळाचा खेळ खेळत होते. मुलगा जिंकत होता किंवा त्याला वाटत असावं की आपण जिंकतोय. मुलगा बाबांना म्हणत होता, “काय बाबा, तुमच्याकडे बाकी महत्त्वाच्या खेळाडूंपेक्षा प्यादीच जास्त शिल्लक आहेत. या प्याद्यांनी तुम्ही जिंकणं आणि राजाला वाचवणं अशक्य आहे.” बाबा फक्त हसले. मुलाला म्हणाले, “तुला मी सिंह आणि त्याला disturb करणाऱ्या उंदराची गोष्ट सांगितली नाही ना?” मुलगा विचार करत म्हणाला, “नाही हो. कोणती?”

बाबा सांगू लागले, “सिंह म्हणजे जंगलचा राजा. आता एक उंदीर चुकून सिंहाच्या अंगावर चढला. सिंहाची झोप disturbed झाली. तो भयंकर संतापला. उंदराने विचार केला की आता काही आपली खैर नाही आणि पटकन तो म्हणाला, “महाराज, अभय द्या. मी भविष्यात कधी ना कधी तुमच्या कामी नक्की येईन.”

सिंह मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अस्स?” उंदीर विश्वासाने म्हणाला, “तुम्ही आत्ता हसताय. पण मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भविष्यात नक्की तुमच्या उपयोगी पडेन.” सिंहाला त्याच्या धैर्याचं कौतुक वाटलं. त्याने उंदराला सोडून दिलं.

काही दिवस लोटले. एकदा काही शिकारी जंगलात आले. त्यांनी या सिंहाला जाळ्यात अडकवलं. तो जाळ्यात असून सुद्धा त्याला पकडण्याची कोणाची हिम्मत होईना. ते strategy आखू लागले. सिंह आत्ता तर जाळ्यात अडकलाय असा विचार करून ते दुसरीकडे जाऊन विचार करू लागले. सिंह त्यांच्या नजरेआड गेला आहे असं जाणवताच संधीचा फायदा घेत सिंहाने काही दिवसांपूर्वी सोडून दिलेला उंदीर सिंहापाशी आला. सिंहाला तो अशा वेळी तिथे पाहून आश्चर्य वाटलं. उंदीर एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्याने पटापट सिंहाभोवतीचं जाळं कुरतडून टाकलं. सिंह वाचला होता. “मी तुमच्या उपयोगी पडेन” हे आपलं वचन उंदराने पाळलं होतं.”

 

 

“बाबा मग ते शिकारी होते त्यांचं काय झालं? त्यांना सोडलं नसेल सिंहाने.”  मुलगा उत्सुकतेने म्हणाला.

“व्वा. हा प्रश्न आम्हाला कधी पडला नाही. तुला पडला हे चांगलंय. पण या गोष्टीत शिकण्याच्या दृष्टीने त्या पेक्षा सुद्धा काहीतरी महत्त्वाचं आहे. ते म्हणजे उंदरा सारख्या छोट्या प्राण्याने सिंहाचे अर्थात जंगलाच्या राजाचे प्राण वाचवले. याचाच अर्थ कोणालाही कमी लेखू नये.” बाबा मुलाचे पुढे आलेले केस मागे सरकवत म्हणाले.

“हां... good learning” मुलगा विचार केल्यासारखा म्हणाला.

“हो ना... मग good learning apply पण करा.”

“म्हणजे?” मुलगा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.

“आमच्या प्याद्याला कमी लेखू नका.” बाबा मिश्कीलपणे हसत म्हणाले. मुलगा बुद्धिबळाच्या पटाकडे पाहू लागला.

बाबा पुढे म्हणाले, “आणि शत्रूबाबत गाफील तर बिलकुल राहू नका.” बाबांनी पुढची चाल खेळली आणि म्हणाले, “आणि मगाशी तू म्हणालास ना की बाबा मग ते शिकारी होते त्यांचं काय झालं, तर त्यांनी तिथून धूम ठोकली. जशी पळापळ आता तुझ्या राजाची होईल.”

मुलगा आश्चर्याने म्हणाला, “म्हणजे?”

बाबा म्हणाले, “म्हणजे हा माझ्या प्याद्याकडून तुझ्या राजाला चेक... अब भागो...”

 

-वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...