Skip to main content

अनपेक्षित अडचण

A Click By: Varun Bhagwat

आदित्य सरळ रस्त्याने आपल्या वाटेने चालत होता. बराच वेळ तो चालत होता, अथक! थांबून कसं चालेल? ठरवलेलं लक्ष्यतर गाठायचं होतं. पण त्याचे पाय अचानक चालता चालता थांबले. त्याला जाणवलं की तो एकटा नाहीये.

कोणीतरी जवळ आलं आणि त्याला म्हणालं, "काय झालं?"
आदित्य म्हणाला, "कुठे काय?"
"मग चालता चालता थांबलास का?" त्याचा प्रश्न आला.
"अचानक अनपेक्षित असं काहीतरी समोर आलं." आदित्य उत्तरला.
"अनपेक्षित?"
"हो."
"म्हणजे नेमकं काय?"
"बघ ना, समोर तुलाही दिसतोय ना, केवढा मोठा डोंगर उभा आहे."
"हा डोंगर तुला अनपेक्षित होता?"
'अर्थात."
"असं का बरं?"
"इतका वेळ सरळ रस्ता होता, मी ही चालत होतो."
"सरळ रस्ता किती वेळ असणार? हा डोंगर कधी ना कधी समोर उभा ठाकणारच होता, तो आज उभा ठाकला."
"पण अपेक्षा नव्हती असं काही असण्याची."
"एखादा सिनेमा तू बघतोस आणि त्याचा शेवट जर कोणालाही लगेच कळेल असा झाला तर तू काय म्हणतोस?"
"हेच की खूप predictable होता end!"
"Predictable असेल तर मजा येते का?"
"नाही."
"आयुष्याचं तसंच आहे. घडणारी पुढची प्रत्येक गोष्ट जर Predictable असेल तर bore होऊन जाईल आयुष्य!"
"पण अवघड आहे यार, हा डोंगर कसा पार करायचा?"
"दुसरा पर्याय आहे?"
"खरंतर नाही. I mean पुढे जायचं असेल तर डोंगर पार करण्याशिवाय पर्याय नाही."
"झालं तर मग! कधीकधी ना हे बरं असतं."
"काय?"
"पर्याय नसला की जे आहे समोर ते करावं लागतं. हां, ते कशा पद्धतीत करायचं याचा पर्याय मात्र आपल्याकडे असतो."
"म्हणजे?"
"काही गोष्टींना इलाज नसतो. त्या कराव्या लागतात. फक्त त्या हसत करायच्या की रडत हे आपलं आपण ठरवावं लागतं. मान्य आहे समोर डोंगर आहे तुझ्या! पण एक नक्की, आपण नुसतं करायची म्हणून एखादी गोष्ट नाही करणार आहोत. ती का करायची हे समजून घेणार आहोत. डोंगराला अडचणीऐवजी संधी बनव."
"त्याने काय होईल?"
"डोंगर चढताना दम कमी लागेल. त्या सोबत आपण हे का करतोय ह्याचा विचार कर."
"म्हणजे?"
"म्हणजे डोंगर चढल्यावर जे सुंदर दृश्य दिसेल त्याला कसलीच तोड नसेल. त्याचा विचार कर. हे कष्ट फलदायी ठरले हे तेव्हा जाणवेल. हे लक्षात ठेवून डोंगर पार करायला लाग. जमेल!"

आदित्यला हे ऐकून थोडा धीर आला. त्याने डोंगराकडे एकदा पाहिलं. विचारापेक्षा कृती करावी असा विचार केला. त्याने शेजारी पाहत पटकन प्रश्न केला, "आपण कोण?"

"माझं नाव धैर्य! मी लोकांच्या मनात असलो की प्रश्न नाही. पण कोणी खचलं तर मला बाहेर येऊन असा संवाद साधून पुन्हा त्या माणसात प्रवेश करावा लागतो. आता पुढच्या क्षणी मी तुला दिसणार नाही, कारण मी तुझ्यात असेन. 
आदित्यने "पण" असं म्हणून मान वळवेपर्यंत ती व्यक्ती निघून गेली होती. धैर्याचा आवाज आला, "तू चालत राहा. डोंगर असो, वा सरळ रस्ता! अपेक्षित असो वा अनपेक्षित अडचण असो, मी सोबत करणार! अट एकच की तू माझी सोबत नाकारायची नाहीस!"

 

- वरुण भागवत

Comments

  1. व्वा खूपच सकारात्मक... तुझ्या प्रत्येक blog मधून खूप काही शिकायला मिळतं...

    ReplyDelete
    Replies
    1. माझा आपला छोटा प्रयत्न! खूप खूप धन्यवाद!!

      Delete
  2. Khup chaan... Very positive 👌👌

    ReplyDelete
  3. Khupch sundar varun...
    Blogs vachalyvar aase vatate ki, Pratek problems var tuzykade solutions Aahet..
    Very positive energy.... 🙋
    👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...