"नवा दिवस, नवी सुरुवात.नव्या दिवसाची नवीआस.जे चांगलं घडून गेलंते मनात साठवायचं.वाईट तेवढं मनाच्यादारातून बाहेर सोडून द्यायचं.
एक होतं गाव, त्या गावात होता एक अजब मनुष्य! दिसायचा
अजब पण होता मोठा हुशार. माणसं त्याच्याकडे सल्ला घ्यायला यायची. भोंदू बाबा
नव्हता बरं तो. आजकाल तुमचे ते psychologists वगैरे
असतात ना तसा काहीसा होता तो." वडील आपल्या नुकत्याच नोकरीला लागलेल्या
मुलीशी बोलत होते.
"पण याचा माझ्या problem शी काय संबंध आहे??" मुलगी मधेच तोडत म्हणाली.
"ऐक तर खरं!" बाबा गोष्ट सांगत होते, "हां, तर
या माणसाकडे असेच एक दिवस काही जण सल्ला मागायला आले. याच्या सल्ला देण्याच्या
पद्धती फार भन्नाट होत्या. त्याने काय केलं माहितीये?"
"काय?"
"त्याने आधी त्यांचं म्हणणं ऐकलं. घडायची
ती चर्चा थोडी घडली. मग मन रिझवायला त्याने त्या माणसांना एक विनोद ऐकवला. ती
माणसं पोट धरून हसली. त्यांचं हसणं विरु लागल्यावर त्याने पुन्हा विनोद सांगितला.
"मग पुन्हा माणसं हसली?"
"हो, पण
थोडी कमी हसली!"
"का? Joke bore होता
का?"
"नाही बेटा, त्याने
पुन्हा तोच joke सांगितला होता."
"का?"
"ऐक तर. हसणं कमी झाल्यावर पुन्हा त्याने
तोच विनोद सांगितला. आता मात्र माणसांनी हसल्यासारखं केलं. एकाने धीर करून विचारलं
की तुम्ही सारखा सारखा तोच विनोद केल्यानंतर कसं हसू येईल?"
"Correct आहे. कोणीतरी हे विचारायला हवंच होतं.
आधीच ते लोक problem
मध्ये असताना हा तोच joke मारत असेल तर काय होणार लोकांचं?"
"Exactly! त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणाला, "तुम्ही जर एकाच विनोदावर सारखे हसू शकत
नसाल तर एकाच problem
वर सारखे का रडताय?"
सारखी त्याच त्या problem ची रट लावलेल्या मुलीला आपण उगाच त्या problem ने तोंड पाडतोय हे जाणवलं.
"मग पुढे काय झालं बाबा? problem solve झाला त्यांचा?"
"लगेच नाही, पण
तो solve करायला बळ मिळालं."
- वरुण भागवत
Are wah! Mastach!
ReplyDelete1 no..
ReplyDeleteGood advice... 🙋
👌👌👍👍
Are wa ashich. Nice thought
ReplyDeleteKharch ...true
ReplyDelete