Skip to main content

ए दोस्त...

A Click by: Sushil Ladkat


“काय म्हणतायत तुमचे मित्र?”

“सगळे मस्त आहेत बाबा.”

“तशा सारख्या parties चालू असतातच तुमच्या. म्हणजे खुश दिसताय...”

“बाबा, you know ही सगळी पार्टीप्रिय मंडळी आहेत. It’s fun... right?”

“हं...”

नीरज बाबांशी हे बोलत असताना त्याच्या फोन वर काहीतरी करण्यात मग्न होता. आज नीरजच्या बाबांना नीरजशी गप्पा मारायला तसा निवांत वेळ मिळाला होता. किती दिवस ते खरंतर या विषयावर त्याच्याशी बोलायचा विचार करत होते. आज त्यांनी बोलायचं ठरवलं. नीरजचं typical teenager सारखं वागणं अगदीच त्याच्या वयाला शोभणारं होतं. मात्र बाबांना हे ही जाणवत होतं की नीरजची संगत म्हणावी तितकी चांगली नाही. अगदी वाईट होती अशातला भाग नाही. नीरजला म्हणायला खूप मित्र होते. मात्र त्यांच्या मते ते नावापुरतेच होते. नीरजचा एकच खरा मित्र होता अभिनव ज्याच्याशी सध्या नीरज बोलत नव्हता. त्याच्यावाचून आपलं काही अडत नाही आणि आपल्याला बाकीचे खूप मित्र आहेत हे तो दाखवत होता. बाबांच्या मते हे त्याचं फक्त cover होतं. बाबांनी थेट विषयालाच हात घातला.

“नीरज, या तुमच्या मित्रांमधला एक तरी मित्र तुला काही झालं तर वेळेला उभा राहील का?”

“हा काय प्रश्न आहे का? एक आवाज दिला की येतील.”

“दे मग आवाज.”

“काय?”

“Let’s take a test.”

“बाबा, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे.”

“माझा नाही.”

“बाबा..”

“See, if you are confident, then prove it. एक छोटी test. चल, जो मित्र पहिल्यांदा येईल त्याला माझ्याकडून party.”

“बाबा, be careful. खूप जण येतील.”

“ते माझ्यावर सोड. कोणालाही फोन कर आणि सांग. आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. मी संकटात आहे. बाकी काहीच बोलू शकत नाही. तुझी गरज आहे.”

“एवढंच?”

“हो. reply ची पण फार वाट पाहू नकोस. let’s see कोण येतंय?”

 

नीरजने पटापट फोन फिरवले. बाबांनी सांगितलेली tape सर्वांना ऐकवली. पुढचे २ तास ते वाट बघत बसले. कोणीच आलं नाही. नीरज अस्वस्थ होत होता.

“आज तशी सुट्टी आहे ना... त्यामुळे busy असायचं कारण नाही कोणाचं. नाही का?” बाबा बोलत होते. “आणि मी काय म्हणतो, अभिनव ला एखादा फोन...”

बाबांचं वाक्य तोडत नीरज म्हणाला, “नाही.”

बाबा म्हणाले, “बरं. कोणी येत नाहीये तोपर्यंत एक गोष्ट ऐकणार. ऐकच. संजू आणि राजू असे २ मित्र जंगलातून जात होते. राजू मोठ्या तोऱ्यात म्हणत होता की तुला काही लागलं तरी आपण आहे. तेवढ्यात एक अस्वल येताना दोघांनी पाहिलं. राजूला शेजारी एक उंच झाड दिसलं आणि तो त्या झाडावर पटकन चढून बसला. संजूला झाडावर चढता येत नव्हतं. अस्वल जवळ येतंय हे कळताच तो तिथेच आडवा झाला. श्वास रोखून धरत त्याने मेल्याचं सोंग केलं. अस्वल मेलेलं काही खात नाहीत हे त्याने ऐकलं होतं. किमान याने तरी आपल्याला खाऊ नये अशी तो आशा करत होता. अस्वल जवळ आलं. त्याच्या कानापाशी, तोंडापाशी त्याने थोडं हुंगलं आणि सरळ निघून गेलं. ते लांब गेल्यावर राजू झाडावरून उतरला आणि संजूला म्हणाला, “काय रे? तुझ्या कानात त्याने काय सांगितलं?” संजू शांतपणे म्हणाला, “ते म्हणालं की त्या झाडावर बसलेल्या मुलाशी कधीच मैत्री करू नकोस. जो संकटकाळी तुला सोडून गेला.”

  

तेवढ्यात बेल वाजली.

नीरज खुश होत म्हणाला, “मी म्हटलं होतं. कोणी ना कोणी येणार. मीच उघडतो दार.”

 

नीरजने दार उघडलं. समोर एक मुलगा खूप अस्वस्थ होता. नीरज दिसताच त्याला हायसं वाटलं. नीरज अवाक होऊन पाहत राहिला. समोर अभिनव होता. अभिनव घाईघाईत बोलू लागला, “नीरज यार, तू ठीके ना.. काय झालं? बाबांनी message केला की तू संकटात आहेस आणि त्यांना पोहोचायला वेळ लागतोय.”

तेवढ्यात बाबांनी मध्यस्थी केली, “are अभी तू तर गावाला होतास ना..”

अभिनव म्हणाला, “हो message बघून तशीच kick मारली आणि निघालो. म्हणून तर २ तास लागले. Is everything all right?”

 

नीरज आणि बाबांची नजरानजर झाली. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. नीरजला फक्त बाबांनी मगाशी म्हटलेलं वाक्य आठवलं, “दोस्त कमी असले तरी चालतील पण वेळेला ते आपल्यासोबत उभे असले पाहिजेत.”

 

-वरुण भागवत

Comments

  1. गोष्टीची खूप छान मांडणी

    ReplyDelete
  2. Goshta shevatparent rangat aanalis! 📝
    Khup Chan !👌👍






    ReplyDelete
  3. आजच्या पिढीतील तरुणांचे डोळे उघडणारी कथा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...