| A Click by: Sushil Ladkat |
“दादा, please यार, महेश माझ्याशी अशा
पद्धतीने वागणार असेल ना तर खरंच त्याचा आणि माझा संबंध संपला. दोस्ती गेली तेल
लावत.”
“Don’t overreact प्रशांत.”
“मी overreact करतोय?”
“तो चुकून तुझ्या अंगावर ओरडला असणारे.”
“चुकून?”
“हां... म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी
वेगळं tension असेल आणि तू wrong timing ला काहीतरी बोलला असशील. म्हणून म्हणलं
चुकून ओरडला असेल.”
“असं कोणी चुकून ओरडतं का?”
“नुसतं ओरडत नाही... मारतं पण..”
“काय?”
“अरे त्या २ मित्रांच्या गोष्टीमध्ये नाही का
अक्षय तुषारच्या कानाखाली मारतो.”
“असं अर्धवट सांगू नको.”
“२ मित्र म्हणजेच अक्षय आणि तुषार beach वर निवांत
बसले होते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि अक्षयने तुषारच्या कानाखाली वाजवली.”
“आणि मग?”
“मग काय... तुषार ने समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीत लिहिलं- आज माझ्या मित्राने मला थोबाडीत मारली.”
“इतकंच?”
“हं... थोडा वेळ शांततेत गेला. हे होऊन
सुद्धा त्यांचा समुद्रात मस्त डुबकी मारायचा plan काही बदलला नाही.”
“आश्चर्य आहे.”
“कदाचित मिटवलं असेल त्यांनी. may be अक्षय
sorry म्हणाला असेल.”
“तुषार ने उलटा हात नाही उचलला?”
“मैत्रीत असं नसतं प्रशांत. त्यांच्या
मैत्रीत तरी नव्हतं. So, मग ते दोघेही समुद्रात थोडे आत गेले. नेमकी एक मोठी लाट
आली आणि अक्षयच्या लक्षात आलं की तुषार पाण्यामध्ये गटांगळ्या खातो आहे. अक्षय
पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने पटकन तुषारला वाचवलं. सुरक्षितपणे पाण्याबाहेर
आणलं. तुषार किनाऱ्यावर शांत बसला होता. मध्ये थोडा वेळ गेला. तुषार तिथून उठला.
तुषारने जवळ असणारी एक टोकदार वस्तू उचलली. तिथून थोड्या अंतरावर एक दगड होता.
तुषार दगडाजवळ गेला. त्याने दगडावर कोरलं- आज माझ्या मित्राने मला मरणाच्या
दारातून वाचवलं.”
प्रशांतला त्या क्षणी तो प्रसंग आठवला जेव्हा
त्याचा accident झाला होता आणि त्याला पहिलं हॉस्पिटल मध्ये नेऊन प्रसंगाचं भान जपणारा
महेश आठवला. प्रशांत एकदम शांत झाला.
त्याने दादाला विचारलं, “दादा, पण या गोष्टीत
तुषारने त्याच्या बाबतीत घडलेले चांगले-वाईट दोन्ही प्रसंग लिहिलेच की. मग यात...”
प्रशांत ला तोडत दादा म्हणाला, “खरंय. पण
त्याला थोबाडीत बसली होती ते वाक्य त्याने रेतीत लिहिलं, जे येणाऱ्या लाटांसोबत
पुसलं गेलं. मात्र अक्षयने त्याचा जीव वाचवला ते वाक्य त्याने दगडात कोरलं.
मतितार्थ लक्षात घे. वाईट गोष्टी पटकन let go करता आल्या पाहिजेत. Memory चांगल्या
गोष्टींची जमवायची. महेश च्या मनात काही नसतं हे तुलाही माहितीये. माफ करता आलं
पाहिजे. माफी सोड, वाईट तेवढं सोडून देता आलं पाहिजे. असं ego वर घेतलंस तर ‘मैत्री’
या शब्दाला किंमत राहणार नाही. तू त्याच्याशी संबंध संपवून जिंकशील सुद्धा पण त्या
जिंकण्याला काय अर्थ आहे ज्याचा आनंद घेता येऊ शकत नाही? त्याच्याशी न बोलून तू
खुश राहशील का? मनाच्या कागदावर चांगल्या गोष्टींची आठवण कोरावी. बाकी कागद
कोराच ठेवावा. नव्या आठवणी कोरण्यासाठी.”
तेवढ्यात प्रशांत ची message tone वाजली.
महेश चा message होता. “sorry यार आज जे झालं त्याबद्दल... तुला भेटावं वाटतंय.
वेळ आहे?”
प्रशांतचा आपसूक reply गेला, “भरपूर!”
-वरुण भागवत
छान
ReplyDeleteMast
ReplyDeleteKhupch chan
ReplyDeleteव्वा व्वा अप्रतिम.. छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठी छान शिकवण मिळत आहे
ReplyDeleteFriendship is forever beloved of love... 🙋😍👌👍
ReplyDeleteKhup Chan ☺
Chan ch
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete