Skip to main content

संकटाची चाहूल

A Click by: Sushil Ladkat


“संकट कसं येतं?”

“कसं येत म्हणजे?”

“सांग ना.”

“सांगता येत नाही.”

“काय सांगता येत नाही?”

“संकट कसं येईल हे सांगता येत नाही.”

“मी जगावर येणारं संकट किंवा unprecedented संकट असल्या संकटांबद्दल बोलत नाहीये.”

“मग?”

“संकट येऊ शकतं असं वाटत असेल तर किंवा काही काळंबेरं आहे असं वाटत असेल तर काय करू शकतो आपण?”

“असं होय. Then reframe your question. थोडक्यात तुला जाणून घ्यायचं आहे की संकटाची चाहूल घेणं म्हणजे काय असतं?”

“हं... kind of yes.”

“हे बघ असं काहीच वेगळं करू नाही शकत आपण. Alert राहावं लागतं कायम बाकी काही नाही.”

“Alert राहायचं म्हणजे काय?”

“म्हणजे आजूबाजूला नजर असली पाहिजे. प्रत्येक वेळी आपलाच अनुभव कामी येतो असं नाही. दुसऱ्याच्या अनुभवाने सुद्धा मनुष्य शहाणा होऊच शकतो. किंवा त्याचं निरीक्षण त्याला संकटापासून वाचवू तरी शकतं किंवा सावध तरी करू शकतं. पण हा प्रश्न अचानक का पडला रे तुला?”

“अरे दादा काय सांगू, सहज जेव्हा observe करतो तेव्हा जाणवतं आणि मला ना काही माणसांची गंमत वाटते. तोंडावर गोड असतात आणि आत वेगळंच. अशा वेळी काय करायचं, त्यांच्याशी वागायचं कसं? की तोंडाला लागायचंच नाही त्यांच्या?कळत नाही. यांना भेटणं हे सुद्धा संकट असतं कधी कधी. वागावं कसं?”

“तो निर्णय परिस्थितीजन्य असला पाहिजे.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं की त्या smart कोल्ह्यासारखं वागता आलं पाहिजे.”


“कुठला कोल्हा?”

“एकदा काय झालं, एक सिंह आजारी पडला. सगळे जण मग त्याची चौकशी करायला जायचे. सिंह दुबळा झाला असं सगळ्यांना वाटलं. तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा. चौकशी करायला एकदा कोल्हा गेला. आता बघ हां, smart कोल्ह्याने आधी अंदाज घेतला. एक छोटं analysis करता आलं पाहिजे.”

“म्हणजे? काय केलं त्याने?”

“कोल्ह्याने थोडे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केलं. त्याला कळत नव्हतं, सगळ्यात भयंकर शिकारी अर्थात सिंह हा दुबळा होईल का? ठीके, झाला तरी उगाच गोड बोलेल का? की म्हणूनच गोड बोलेल? गोड बोलून त्याचा फायदा काय? ही फसवणूक तर नाही ना? हे सगळे प्रश्न कोल्हयाने स्वत:ला विचारले आणि गुहेच्या बाहेरच थांबून त्याने सिंहाच्या तब्येतीची चौकशी केली. सिंह म्हणाला, “मी ठीक ठाकच आहे. पण तू मला भेटायला आत का येत नाहीस?” कोल्हा म्हणाला, “आलो असतो, पण या गुहेत आत जाणारी पावलं दिसतायत. बाहेर येणारी नाही.”

 

“Wow...”

“याला म्हणायचं संकटाची चाहूल लागणे. अंदाज घेता आला पाहिजे.”

“पण प्रत्येक वेळी अंदाज योग्यच असेल असं नाही.”

“म्हणूनच त्याला अंदाज असं म्हणतात. अंदाज चुकू शकतो, त्यातून आपण शिकू शकतो. पण analyze करता आलं पाहिजे. विचार न करता एकदम काहीतरी करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं. कोल्ह्याला पण कुठेतरी अनुभव आला असेल म्हणून तर तो smart झाला असेल.”

“हं... थोडक्यात काय... आपले डोळे उघडे असले पाहिजेत... मग अंदाज घेता येतो धोका आहे, संकट आहे की आपल्याला हवी अशी परिस्थिती आहे.”

“Yes.”

 

-       वरुण भागवत

Comments

  1. Khup chhan.Nehmi Savadh rahayala pahije.

    ReplyDelete
  2. आयुष्यात प्रत्येकाने सतर्क असलेच पाहिजे 👍👍👍

    ReplyDelete
  3. Great. Very clever. It's need of time.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...