Skip to main content

वेळेचा खेळ

A Click by: Varun Bhagwat


Office च्या cafe मध्ये नुसतीच स्वत:च्या नादात समोर असलेली coffee ढवळत बसणाऱ्या सरिताला तिची senior प्रणाली म्हणाली, “काय गं, तोंड का पाडलंयस?

सरिता एकदम भानावर येत म्हणाली, “अं, काय?”

“झालं तरी काय?” प्रणालीने विचारलं.

“आता ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांना कोण काय बोलणार?

“ कोणाला काय बोलणार?”

“आरती madam कडे जरा काम होतं.”

“मग?”

“त्या माझ्यापेक्षा खूप senior आहेत.”

“असतील.”

“असतील नाही आहेत.”

“मुद्दा काय?”

“त्या मला काही बोलल्या तर मी उलट उत्तर द्यायचं का?”

“मुळीच नाही.”

“घ्या. मग कसं जगायचं आमच्या सारख्यांनी?”

“हां... पण तुझी चूक नसेल तर बोलायचं.”

“उलट?”

“नाही. पण आपल्याला काय म्हणायचं आहे ते पोचलं पाहिजे. या ना त्या प्रकारे...”

“मी तीन वेळा बोलायचा प्रयत्न केला पण she was not in a position to listen.”

“हं. मग जरा योग्य वेळेची वाट बघायची.”

“आणि ही योग्य वेळ काय असते आणि कधी येते?”

“त्यासाठी आपण alert राहायचं.”

“अशी कोड्यात बोलू नकोस यार.”

“मग कसं सांगू?”

“ते माहित नाही. पण समजेल असं सांग.”

cafe मध्ये शेजारच्या टेबल वर बसल्या बसल्या त्यांचा colleague विकी पेंगत होता. प्रणाली ते पाहून हसू लागली.

सरिता म्हणाली, “हसू नको यार. मला समजून सांग.”

यावर प्रणाली म्हणाली, “झोपणाऱ्या विकीला पाहून मला ती गोष्ट आठवली. I guess it will help.”

“Tell me.”

“एक होता राजा. त्याच्या दरबारात खटला चालू होता. एका तरुणावर फार आरोप लावले जात होते. तुझ्यासारखा बिचारा झाला होता तो. खटला अनेक दिवस चालू होता. इतके दिवस सगळे फासे त्याच्या विरूद्धच पडले होते. आज मात्र बाजू पलटली होती. खरी बाजू समोर येऊ लागली होती. जशी तुला तुझी बाजू मांडायची होती. पण आज राजा वेगळ्याच stress मध्ये होता. जसे तुझे boss पण stress मध्ये असू शकतात वेगळ्याच and may be that’s why you were neglected. या गोष्टीत अजून एक गंमत म्हणजे राजाची झोप पण झाली नव्हती. नेमकं या तरुणाच्या बाजूने बोलणं चालू असताना राजाला भर दरबारात झोप लागली. हां, तर झोपलेले महाराज पाहून कोणी काहीच बोलेना. कोण बोलणार ना? थोडा वेळ शांतता. राजाला एकदम जाग आली. त्याने तडकाफडकी त्या तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली. तरुण म्हणाला, “या शिक्षेबद्दल मी तक्रार करेन.” राजा चिडला आणि म्हणाला, “मी राजा आहे. तू तक्रार कुठे करणार?” तरुण उत्तरला, “मी झोपलेला राजा आणि जागा असलेला राजा या दोघांच्या विरोधाभासी निर्णयाविरुद्ध तक्रार करेन. कारण यातला एक राजा न्यायाची बाजू ऐकतो आणि त्याने मला शिक्षा दिलेली नाही. दुसरा राजा क्रूर आहे. झोपेत निर्णय देतो.” राजाला त्याची चूक समजली, त्याने पुढील सुनावणी ऐकत योग्य निर्णय दिला. तरुण सुटला.”  

““अगं माझे boss काही झोपले नव्हते.”

“गोष्ट झोपेबद्दल नाहीये. योग्य वेळ साधण्याबाबत आहे. लक्षात घे. कोणत्या वेळी काय बोलावं आणि योग्य वेळी आपण जर चुकीचे नसू आणि समोरचा अन्याय करत असेल तर कशा पद्धतीत आपली बाजू आपण मांडू शकतो हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न.”

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...