![]() |
| A click by : Varun Bhagwat |
Beach ला लागून असलेल्या एका हॉटेल मध्ये चहा घ्यायला बसलो होतो. तिथे एक सुविचार लिहिला होता. - माणूस स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं सुख पाहून जास्त दुःखी होतो.
पुन्हा एकदा ते वाचलं. म्हटलं, कमाल आहे माणसाची. सुखाची concept comparative झाली तर! का ती तशीच आहे? की काही जणांनी ती तशी बिंबवली आहे. बरं, आजूबाजूला सहज नजर फिरवली तर दिसतं पण असं की हीच concept रूढ होत चाललीये.
पण असं का व्हावं? मनुष्यस्वभाव? पण पुन्हा स्वभाव म्हटलं तर प्रत्येकाचा वेगळा... मग compare तरी कसं करायचं???
पण इथेच तर खरी मेख आहे. आम्हाला compare च करायचंय!!!
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला पण एकाच basis वर compare करायचं हे syllabus मध्ये असल्यासारखं compulsory केलंय... आपणच!
त्याच्याकडे भारी गाडी आहे, म्हणून ती मला घ्यायचीये. वास्तविक मला गाडीची गरज नसते त्या वेळी!!! पण artificial गरज निर्माण केली जाते आणि सुखाची व्याख्या ठरवली जाते. मग होतं अवघड...
त्याचं package जास्त आहे ही गोष्ट लक्षात येते. खरंतर माझा पगार मला पुरत असतो. पण मिळायला पाहिजे जास्त पैसे असं वाटू लागतं. कारण तो जास्त सुखी होईल आणि मग त्यामुळे मी दुःखी झालो म्हणजे???
मग मी लागतो त्या race मध्ये (सुखी होण्याच्या)! या race ला सुरुवात असते मात्र शेवट नसतो.
मला पळावं लागणार आहे हे कळतं पण कुठपर्यंत पळणार असं विचारलं तर उत्तर असतं 'सुखी होईपर्यंत!'
इथे लहानपणी शिकलेले रामदासांचे मनाचे श्लोक पूर्ण विसरतात.
'जगी सर्वसुखी असा कोण आहे?
विचारे मना, तूचि शोधून पाहे|'
पण मला विचारायचं नसतं, शोधायचं नसतं.
बरं, सुखामागे धावतोय पण सुख काय असतं हे पण शोधायचं नसतं. पण दुसऱ्याचं सुख पाहून कष्टी व्हायचं असतं.
अगदी कायम ऐकायला मिळणारं वाक्य- बरंय बुवा तुमचं!
अरेच्या... काय बरंय... कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे काही कल्पना नसते आणि ठोकून द्यायचं असलं वाक्य की बरंय तुमचं!
यातून साद्ध्य काय तर स्वतःचं दुःख वाढवायची कामं!
कारण सुख म्हणजे समोरच्याला टारुन (हरवून) त्याच्या पुढे जायचं. गेलो तर ठीक नाहीतर व्हा दुःखी.
मी bill pay करून हॉटेलातून बाहेर पडलो. ते वाचलेलं वाक्य was an 'eye opener'!!!
Beach वर काही जण selfie मग्न होते. एकीने पाहिलं की तिची group member 'more than average per minute'. selfie घेतीये. थोडक्यात खूप photos काढतीये.
तिने पटकन काहीतरी calculations केली आणि हिची social media वर जास्त updates जाणार असा तिचा विचार झाला असावा आणि तिचं सुख पाहून हिला दुःख होईल या विचाराने हिने selfie संख्या वाढवायला सुरुवात केली सुखी होण्यासाठी.
तेवढ्यात माझं लक्ष दुसरीकडे वळलं.
एक काका आणि त्यांचा छोटा मुलगा मावळणाऱ्या सुंदर लालबुंद सूर्याकडे बघत होते. त्यांना ते पाहून छान वाटत होतं. छोटंसं सुखच की हो ते!
मी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर रेतीमध्ये बसलो.
त्यांच्या सोबतीने मी ही तो आल्हाददायक नजारा पाहू लागलो.
इथे ते वाक्य चुकीचं ठरलं होतं.
त्या दोघा बाप-लेकांचं सुख पाहून मी खिन्न झालो नव्हतो उलट खुश होतो.
मी पण त्यांच्या सुखात माझा आनंद शोधू लागलो आणि सूर्य क्षितिजाला भिडू लागला. खुळचट सुखाचं वेडगळ खुसपट मनावरून निघून जाऊ लागलं. या बाप लेकांनी जुन्या सुखाचा नवा किनारा दाखवला. बाकी समुद्र मी शोधेन!
त्या लहानग्याने 'सुख वाटल्यानं वाढतं' हा नव्याने उगवता सुविचार मावळत्या सूर्याची साक्ष ठेवून आठवून दिला.
- वरुण भागवत

Chha. Very true. Eye opener.
ReplyDeleteThank you very much!! 😊
DeleteKhup chhan Varun.
ReplyDeleteKhup chhan Varun. Tuza lekh follow karanar.
ReplyDeleteKhup khup dhanyawad!!
DeleteSundar! Ekdam khara ani practical!
ReplyDeleteThank you very much!!
DeleteEkdam perfect and very touching and eye opener
ReplyDeleteThank you!! 😊
Deleteखरच "सुख वाटल्याने वाढते"
ReplyDeleteखुप छान लिहल
धन्यवाद!😊
Delete